मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेवर दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या टोळीला पनवेल तालुका पोलीसांनी केले गजाआड
पनवेल दि ०७. :
पनवेल जवळून जाणाऱ्या मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेवर रात्री अपरात्री वाहनचालकांना धाक दाखवून दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या एका टोळीला पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौडकर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने गजाआड केले असून त्यांच्या कडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत साजिद कयूम अन्सारी, वय ३० टँकर क्रमांक एम.एच . १२ एन एक्स ८८८१ ने मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेने पुणे येथे जात असताना एक्सप्रेस या १८०० कि . मी . अंतरावर आले असताना २० ते २५ वयोगटातील तरुणांनी त्याचा टँकर अडवला व त्यांना मारहाण करून ताच्या खिशातील रोख रक्कम व मोबाईल फोन काढून ते पसार होत होते. या वेळी त्यांनी प्रतिकार केला असता त्यांच्या कडे असलेल्या दांडक्याने कपाळावर मारहाण केली व ते पळून गेले. अश्याच प्रकारे या टोळक्यांनी दुसऱ्या टेम्पो चालकास सुद्धा लुटले होते. या संदर्भात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच सदर तपास पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ चे शिवराज पाटील, सहा. पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर, पोनी अंकुश खेडकर, गुन्हे प्रगटीकरण पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक अविनाश पाळंदे, सहा पोलीस निरीक्षक संजय गळवे, सपोउनि मनोहर चव्हाण, पोहवा विकास साळवी, पोहवा मंगेश भूमकर, वैभव शिंदे, पोना राकेश मोकल, पोशी भीमराव खताळ, तुकाराम भोये, पोना जयदीप पवार, पोना पंकज चांदीले, प्रकाश मेहेर, सुनिल कुदळे या पथकाने सदर आरोपींचा शोध सुरु केला असता गुप्त बातमीदारामार्फत मोबाइल विक्री करणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती घेत असताना एक संशयित इसम खालापूर व उरण परीसरात मोबाइल विक्री करत असल्याची माहीती प्राप्त झाली तांत्रिक तपासात सदर इसमाचा प्रस्तुत गुन्हयात समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली. सदर अटक केलेल्या इसमाकडे केलेल्या चौकशीत त्याचे इतर चार साथीदार हे खालापूर परीसरातील आदिवासी पाडयावर राहणारे अत्यंत चपळ, काटक व वेळप्रसंगी अचानक हल्ला करणारे आरोपी असल्याची माहीती मिळाली . गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर ०४ आरोपींच्या वास्तव्याबाबत माहीती घेवून खालापूर रसायनी , खोपोली परीसरातील अनेक आदिवासी पाडयावर अत्यंत सावधपणे वेळोवेळी सापळा रचून सदर आरोपीना शिताफिने अटक केली त्यामध्ये संजय पवार वय ३० वर्षे, रा.बीड खुर्द, पो. जावरूंग,ता. खालापूर, जि. रायगड, कुमार पवार वय २३ वर्षे , रा . बीड खुर्द , पो . जाबरूंग , ता . खालापूर , जि . रायगड , अविनाश धारपवार, वय २० वर्षे , रा वणवेवाडी , पो . ता . खालापूर , जि . रायगड, रितेश जाधव , वय १८ वर्षे , धंदा- बेकार , रा . जि . रायगड , रा . बीड खुर्द , पो . आंबरूंग , ता . खालापूर ,व अक्षय [यावर वय २१ रा मोहोपाडा यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून विविध कंपनीचे २९ मोबाईल तसेच ,मोठ्या प्रमाणात रोख रक्कम हस्तगत केली आहे यांच्या अटकेमुळे पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील २ गुन्हे उघडकीस आले आहेत,. या आरोपींची या पूर्वी खोपोली खालापूर पुणे ता ठिकाणी सुद्धा गुन्हे केल्याची माहिती मिळत आहे