राजकीय क्षेत्रातील अजात शत्रु
लोकसेवक नासिरभाई पटेल यांचा वाढदिवस म्हणजे युवा उत्सव ..
प्रतिनिधि :-
नासिर पटेल सामाजिक, शैक्षणिक विकास ट्रस्ट शिळफाटा
राजकीय जीवनात ८०% समाजकारण आणि २०% राजकरण हे धोरण न पाळता १००% लोकसेवा करणे हेच आमचे धेय्य आहे …नासिर पटेल
पाटिल कुटुंबाची लोकसेवा करण्याची परंपरा आम्ही पुढे चालवत आहोत असे म्हणत त्यांनी स्वतःला राजकीय जीवनात सिद्ध केले.
लोकप्रतिनिधि देश , गांव, शहराच्या प्रगति चे कारण असतात. नगरसेवक अभ्यासु, आदर्श, मेहनती आणि सज्जन असतील तरच त्या शहराची आधुनिक प्रगती होते.. एक लोकप्रतिनिधि शहराच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी नियोजन करताना त्याला लोक सहकार्य आवश्यक असतो अश्या परिस्थितित स्वतःला सिद्ध करणे म्हणजे एक परीक्षा असते आणि त्या परीक्षेत त्यांनी कधी कोणाला न दुखावता यश प्राप्त केले .
नगरसेवक आदर्श,प्रामाणिक, अभ्यासू , हसतमुख, सर्वाना सांभाळून घेणारा असावा आणि ते प्रभाग ९ ला मिळणे आमच भाग्य समजतो अस त्यांच्या मतदारसंघ मधील मत आहे.
नागरिकांच्या सेवेसाठी कायम तन-मन-धन अर्पण करुन,
विश्वास देणारा सर्वगुणसंपन्न, लोकप्रिय, कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी म्हणजे
नासिरभाई पटेल…..
भाई यांना वाढदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा देताना अनेक लोकांनी त्यांना येणाऱ्या निवडणुकीत कसली ही अपेक्षा न करता तुम्हाला साथ देवू म्हणून प्रेम ,आशीर्वाद ,विश्वास दिले.
नासिरभाई पटेल यांचा २५ डिसेंबर वाढदिवस अनेक वर्षा पासून युवा वर्ग मोठ्या उत्साहात साजरा करतात .
खोपोली शिळफाटा येथील पटेल परिवार म्हणजे सर्व क्षेत्रातील नागरिकांच्या सुखदुःखात प्रथम सहभागी होणारे लोकनेतृव करणारे पाटिल कुटुंब…
खालापूर तालुका व रायगड जिल्ह्यामधील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सन्मानित नाव…..
नासिर महामुदमिया पाटिल .
नगरसेवक होण्यापूर्वी नासिर पटेल सामाजिक, शैक्षणिक विकास ट्रस्ट शिळफाटा
खोपोली या संस्थेच्या लोकसेवेतुंन सक्रिय .
घरातुन राजकिय परंपरा असल्याने राजकारण व समाजकार्याचा वारसा त्यांना लहानपणापासुनच लाभला होता. नासिर पटेल यांनी आपल्या जीवनात विविध सामाजिक,शैक्षणिक अनेक उपक्रम राबविली आहे.
ट्रस्ट मार्फत त्यांनी शहरातील नागरिकांना वेगवेगळ्या माध्यमातून मद्त लोकसेवा केली.
२०१६ रोजी नासिर भाई पटेल
यांना शिळफाटा प्रभाग क्रमांक ९ मधुन खोपोली नगरपरिषदेत नगरसेवक निवडणुकीत विजय मिळवून शिळफाटा प्रभागाची विकास कामे करण्यास सुरुवात केली…
आदिवासी, कातकरी,धनगरवाडा परिसरात अत्यावश्यक असणारे रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी,शिक्षणासाठी शाळा, शौचालय, यासारख्या मूलभूत व अत्यावश्यक असलेली कामे प्रथम करून घेतली.
त्यानंतर शिळफाटा येथील आपल्या जवळच्या परिसरात
आरसीसी गटारे,काँक्रीट रस्ते, फुटपाथ, शौचालय, शाळेची सुधारणा , नवीन समाजमंदिर यांसारख्या अनेक
विकासकामे नगरपालिकेमार्फत करून घेतली.
खोपोली नगरपालिका हद्दीतील प्रभागामधील सर्वात जास्त विकासकामें त्यांच्या प्रभागात झाली . प्रभाग क्रमांक ९
मधील नासिरभाई पटेल यांच्या परिसरात नागरी सुविधा पूर्ण करण्यात त्यांचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व कारणीभूत
असल्याने नगरपालिकेकडून फंडाची योग्य मांडणी
करून प्रभागातील ९५% विकासकामे पूर्ण केली.
२०१६ साली शेतकरी कामगार पक्षातून नासिरभाई पटेल हे
खोपोली नगरपरिषदेच्या निवडणुकीत बहुमताने निवडून
आले.. कोणताही स्वार्थ न पाहता फक्त प्रभागातील विकास कामा वर भर देणे आपले कर्तव्य समजले.
*प्रभाग ९ विकास कामे* :-
शिळगांव बालवाडी, सारसन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्र , मिळगाव येथील हजरत सय्यद सिद्दीक शाहबाबा दर्गा परिसरात संरक्षण भिंत व स्टेज बांधकाम, ताकई गावातील आरसीसी स्मशानभूमी, आदिवासी वाडीत शाळा व मंदिर जवळील पेव्हर ब्लॉक, मुळगांव ठाकूरवाडीतीत आरसीसी शाळा, मिळगाव डंपिंग गावात जाणारा नवीन डांबरी रस्ता, मिळगावात तीन ठिकाणी पाणी प्रवाह जाण्यासाठी मोरी, मिळगाव शंकर मंदिराकडे जाणारा रस्ता व संरक्षण भिंती,पटेल नगर मधील डांबरी रस्ता,
ताकई बैठक हॉल समोर पेव्हर ब्लॉक, शिळफाटा मस्जिदमागील आरसीसी रस्ता व गटार,पटेल नगर परिसरातील काजळे व राजपूत घरासमोरील गटार व पेव्हर ब्लॉक, पटेल नगर इमान राजपूत घरासमोरील आरसीसी रस्ता, पटेलनगर अ.घ खान व रियाज देसाई परिसरात गटार व पेव्हर ब्लॉक, मिळगाव आदिवासी वाडीत चारसीट शौचालय, धनगरवाडा चारसीट शौचालय, मिळगाव शंकर मंदिरजवळ चारसीट शौचालय, नारायणवाडीत फुटपाथ, मिळगावात खुली व्यायामशाळा, संपूर्ण मिळगावात गटार व पेव्हर ब्लॉक, ठाकुरवाडी मुळगाव दुमणे व मेंगाल घराजवळ फुटपाथ, मंगेश निरगुडे व घुरे घराजवळ फुटपाथ, शिळफाटा भाजी मार्केट रोड येथील गटार, लाईट पोल, डिव्हायडर व रस्ता रुंदीकरण, शिळगाव मुख्य रास्ता व आरसीसी गटार, हनुमान मित्र
मंडळात खुली व्यायामशाळा व चारसीट शौचालय, मस्जिद मोहल्ला संपूर्ण आरसीसी रस्ता यासह अनेक कामे कामे पूर्ण केली .
अश्या लोकसेवक अजात शत्रु व्यक्तिमत्व नासिर पटेल यांना त्यांच्या जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा