राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठक

खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावी

                                                       –जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

 

अलिबाग,दि.25 (जिमाका):-  कोकणातील महत्वाचा सण गणेशोत्सव दि.31 ऑगस्ट 2022 पासून सुरु होत आहे.गणेशोत्सवासाठी कोकणात राज्याच्या विविध शहरातून नागरिक येत असतात. त्यांचा प्रवास सुखकर व सुरळीत व्हावा, याकरिता राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी करावी, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले.

               जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरुस्तीबाबत आढावा बैठकीत ते अधिकाऱ्यांशी बोलत होते.

             यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, महसूल, पोलीस विभाग, राष्ट्रीय मार्ग विभागांचे विभागप्रमुख, कार्यालय प्रमुख, कॉन्ट्रॅक्टर्स आदी उपस्थित होते.

             यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देताना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविले जावेत. पोलीस विभागाने गणेशोत्सव काळात महामार्गावरील वाहतूक सुरळितपणे होईल, असे पहावे. महामार्गाच्या कामात विविध तंत्रज्ञानाचा तसेच जादा मनुष्य बळाचा वापर करुन रस्त्यावरील खड्डे बुजविणे, पेव्हर ब्लॉक बसविण्याचे  काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.