राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमाचा वसई भाजपा कडून आज शुभारंभ!

वसई:

वसई भाजपाचे जिल्हा महासचिव व राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे संयोजक उत्तम कुमार यांनी आज वसई नवघर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आरोग्य केंद्राच्या प्रमुख अलमास खान, वसई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भारत जगताप व वसई पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप डोवारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत आयोजित केलेल्या या ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रमात विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक उत्तम कुमार यांनी सांगितले. शुभारंभ कार्यक्रमादरम्यान आरोग्याकेंद्राचे डॉक्टर, नर्स, आशासेविका व सफाई कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास भाजपाच्या श्रीकुमारी मोहन, रमेश पांडे, कल्पेश चव्हाण, मार्कंडेय पांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.