राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल जिल्हा शिष्टमंडळाने नागरी सुविधांबाबत घेतली आयुक्तांची भेट

पनवेल /(प्रेरणा गावंड )

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने पनवेल आयुक्तांची भेट घेऊन तळोजा गाव येथे असलेल्या नागरी अडचणी बाबत शिष्टमंडळाची भेट घेऊन रस्ते ,पाणी ,वीज आरोग्याबाबतच्या अडचणींवर सविस्तर चर्चा केली.

त्यात प्रामुख्याने पथदिवे, दुरुस्ती ,रस्त्यांची दुरुस्ती, पाणीटंचाई, नाले गटार दुरावस्था अशा प्रकारच्या अनेक अडचणींवर राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज फारूक पटेल यांनी आयुक्तांशी सल्लामसलत केल्यानंतर पंधरा दिवसानंतर नागरी सुविधा सोडवल्या गेल्या नाही तर लोकशाहीच्या मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला .

(१)खारघरमधील वेगवेगळ्या सेक्टर मध्ये खेळाची मैदान व बगीचे आहेत त्यामधील ई-टॉयलेट व हायमास्ट दिवे यांची डागडुजी करावी व ज्या मैदानामध्ये किंवा बगीचे मध्ये नाहीत त्याठिकाणी नव्याने असणे गरजेचे आहे.
२) रस्त्याच्या लगत असणाऱ्या झाडांच्या फांदया कापणे. जेने करून रस्त्यावर रात्रीचा दिव्याचा प्रकाश जास्त पडेल.
३)खारघर मधील सेक्टर १४ (रघुनाथविहारच्या मागील) वैकुंट धाम मधील दहन खर्च कमी करण्यात यावा.
४) खारघर मध्ये मोठ्या प्रमाणात बेवारस वाहने विचित्र अवस्थेत वेगवेगळ्या ठिकाणी पडून आहेत त्यांना योग्यठिकाणी ठेवावे.
५)खारघर ते ओवे कॅम्प या जोड़ रसत्यांची डागडूजी करण्यात यावी.
६) ओवे कॅम्प मध्ये पिण्याच्या पाण्याची ही मोठी समस्या आहे. शिवाय तेथील शौचालायाची डागडूजी करण्यात
यावी.
७)खुटुकबांधनवाडा ते खुटुकबांधन वाडी जोड रस्ता करणे व तेथे वीज जोडून देऊन दिवे लाऊन देण्यात यावेत.

“कामोठे शहरातील नागरी सुविधांबाबत अडचणी म्हणजे”
(१) कामोठे शहराला पर्यायाने पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी किंबहुना पाणी आरक्षित करण्याच्या दृष्टीने अमृत योजना व नाव्हाशेवा योजनांना गती देण्यात यावी.
(२) कामोठे शहरातील बहुतांश पथदिवे बंद असून सिडको प्रशासनाशी समन्वय साधून कार्यान्वित करण्यात यावेत.
(३) शहरातील मोकळ्या भूखंडांची स्वच्छता करण्यात यावी.
(४) सिडकोच्या आरक्षित भूखंडावर झालेले अनधिकृत अतिक्रमण देखील सुविधांमध्ये अडथळा
ठरत आहे.
(५) गावठाणांना पडलेला भंगारवाल्यांचा विळखा शहर विद्रुप करू लागला आहे.
(६) कामोठे शहरात बसविण्यात आलेले ई-टॉयलेट बंद अवस्थेत असून कार्यान्वित करावेत.
(७) कामोठे शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या मलनिस्सारण वाहिन्या तुंबल्याने पाणी रस्त्यावर येत आहे, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी.
(८) कामोठे शहरातील मार्जिनल स्पेस अतिक्रमण मुक्त करण्यासाठी उपाययोजना करावी.
(९) शहरातील पालिकेच्या मालमत्तेवरील / रस्त्यावरील बेकायदेशीरपणे सोडून दिलेली/बेवारस वाहने
हटविण्यासाठी मोहीम हाती घ्यावी.
(१०) कामोठे शहरातील समाजसेवा केंद्र नागरिकांसाठी खुले करण्यासाठी सिडकोशी समन्वय साधावा.
(११) पनवेल महानगरपालिका हद्दीतील उद्याने व खेळाची मैदाने विकसित करताना कामोठे शहरातील उद्याने व खेळाच्या मैदानांचा समावेश करण्यात यावा.
(१२) कामोठे शहरातील स्मशानभूमी इतरत्र हलविणेबाबत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ३२१अन्वये प्रेतांची विल्हेवाट लावण्यासाठी नव्या जागांची तरतूद करता येते व अधिनियम ३२३ अन्वये प्रेतांची विल्हेवाट लावण्यासाठी असलेली कोणतीही जागा बंद करण्याविषयी आयुक्त
आपण योग्य निर्देश देवू शकतात.कामोठे वसाहत सेक्टर १५ मधील स्मशानभूमी ही भर लोकवस्तीत असल्यामुळे स्थानिक नागरीकांना आरोग्य, मानसिक व पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विविध समस्या निर्माण करीत आहे. खासकरुन लहान मुले, महिला व जेष्ठ नागरिक यांच्या आरोग्य विषयी तक्रारी वाढत आहेत.
(१३) कामोठे शहरातील पथविक्रेत्यांचे/फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण पूर्ण करून त्यांचे पुनर्वसन करावे.
(१४) गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग, लेन मार्किंगसाठी रस्त्यावर पट्टे रंगविण्यासाठी थर्मोप्लास्टीक
रंगाचा वापर करावा.
(१५) कामोठे क्षेत्रातील वृक्षांच्या भोवतालचे काँक्रीटीकरण / लाया बसविणे / डांबरीकरण / पेव्हरब्लॉक
लावणे / कोबा इत्यादी बांधकाम काढण्यात यावे. संबंधित चर्चेवर आयुक्तांनी शिष्टमंडळांना आश्वासित करून नागरी सुविधांबाबत लवकरच निर्णय घेऊन सर्व समस्यांचे समाधान करण्यात येतील असे उपस्थित चर्चेत कळविले.

या वेळी जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा कार्यध्यक्ष डॉ. शिवदास कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष अजिनाथ सावंत,जिल्हा उपाध्यक्ष दौलत शिंदे,युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद बागल, जिल्हा युवक कार्यध्यक्ष शेहबाज़ पटेल,खारघर शहराध्यक्ष बळीराम नेटके,कामोठे शहराध्यक्ष चंद्रकांत नवले,युवक जिल्हा उपाध्यक्ष रणजीत नरुटे, युवक जिल्हा उपाध्यक्ष राजू नलवाड़े,महेश पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.