राष्ट्रवादी काँग्रेस युवा प्रदेश सचिव संदीप म्हात्रे यांची वसई विरार जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती
महेबुब शेख प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस युवा प्रदेश सचिव संदीप म्हात्रे यांना वसई विरार जिल्हा नवनियुक्त प्रभारी नेमण्यात आले
प्रतिनिधी( प्रेरणा गावंड)दि. १५/०७/२०२२
महाराष्ट्र राज्यातील होणाऱ्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक जबाबदारी देताना
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हा प्रभारी व शहर जिल्हा प्रभारी यादी जाहिर करण्यात आली .
राष्ट्रवादी काँग्रेस युवा प्रदेश सचिव संदीप म्हात्रे यांच्यावर प्रदेश कार्यकारणी कडून आगामी निवडणुक लक्षात ठेवून संघटन बांधणी साठी त्यांना वसई विरार जिल्हा नवनियुक्त प्रभारी पदाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली .
खा. शरचंद्र पवार यांचे विचार तळागळापर्यंत पोहचवून पक्ष बळकट व्हावे व राज्यातील संघटन ध्येयधोरण सर्वसामान्य कार्यकर्ता प्रेम पोहोचवण्यासाठी प्रदेश कार्यकारणी संघटने कडून नवनियुक्त प्रभारी राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश राज्य सचिव संदीप म्हात्रे यांची निवड एक मताने केली.
राष्ट्रवादी काँग्रेस युवा पदाधिकारी व संघटने कडून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले.