राज्य शासनाच्या सूचनांनुसार पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा लवकरच सुरू होत असून शाळांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घ्येण्याच्या सूचना आयुक्त गणेश देशमुख यांनी केल्या आहेत. यांसदर्भात शाळांची पाहणी आज अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आणि शिक्षणाधिकारी बाबासाहेब चिमणे यांनी केली.
कोविड महामारीमुळे सुमारे पावणेदोन वर्षे शाळा बंद आहेत. ऑनलाईनपद्धतीने शिक्षण सुरू असले तरी विद्यार्थ्यांच्या सर्वींगीण विकासासाठी शाळा सुरू होणे गरजे आहे. याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाने पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला असून या शाळांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांनी पालिका क्षेत्रातील विविध शाळांना भेट देऊन तेथील तयारीची माहिती घेतली तसेच आवश्यक त्या सूचनाही केल्या. कोविडचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यकते सर्व उपाय योजनेचे सांगितले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार पालिकेने सर्व तयारी केली असून महापालिकेच्या 11 शाळा लवकरच सुरू होत आहे.
सॅनिटायझर व मास्कचा वापर बंधनकारक, दोन विद्याथ्यांमध्ये सहा फूट अंतर, शाळेत स्वच्छता, शिक्षक व शिक्षकेतर कर्मऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे,शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम,खेळ किंवा सामुहिक प्रार्थना टाळाव्या, ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती असावी अशा सूचना स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
पनवेल महानगरपालिका पनवेल ओमायक्रॉन कोरोना व्हेरिएंटबाबत दक्षता घेण्याची गरज लक्षात घेता कोरोना प्रतिबंधात्मक पूर्वतयारीच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमधील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग 15 डिसेंबर 2021 पासून सुरू करण्यात येतील असे निर्देश मा.महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी शिक्षण विभागास दिले आहेत.