काँग्रेसच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा…
प्रतिनिधी /प्रेरणा गावंड
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने दि 17 सप्टेंबर 2022 रोजी पनवेल काँग्रेस भवन येथील रस्त्यावर राष्ट्रीय बेरोजगारी दिवस (National Unemployment Day) केक कापून व पकोडे तळून पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात आला.
मागील 8 वर्ष पंतप्रधान मोदी यांच्या चुकीच्या निर्णयामुळे त्या मध्ये नोटबंदी, अस्थिर GST, कोविड मध्ये लावलेले उशिरा लॉकडाउन अशा अनेक निर्णयांमुळे बेरोजगारी व महागाई वाढली आहे असे म्हात्रे या वेळी म्हणाले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव विश्वजीत पाटील, पनवेल शहर जिल्हा महिला अध्यक्षा निर्मलाताई म्हात्रे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नौफील सय्यद व युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, महासचिव, सचिव इतर पदाधिकारी उपस्थित होते.