नैनाच्या वतीने विचुंबे-उसर्ली हद्दीमध्ये एका सोसायटीचं मोजमाप करण्याच्या दृष्टीने नैनाची टीम चर्चेसाठी तयार झाली
प्रतिनिधी प्रेरणा गावंड
नैनाच्या वतीने विचुंबे-उसर्ली हद्दीमध्ये मोजमाप करण्याच्या दृष्टीने नैनाची टीम आलेली होती संबंधित प्रकार पुरुषोत्तम भोईर यांना कळताच त्यांनी तालुका चिटणीस राजेश केणी यांच्याशी संवाद साधून सर्व संघर्ष करणारी मंडळी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर झाली.
मूळ प्रकरण सोसायटीच्या अंतर्गत वादातून काही गोष्टी घडत होत्या , या ठिकाणी नैना नकोच ही भूमिका सर्वानुमते ठेवलेली आहे ,तर त्या अनुषंगाने कोणत्याही सोसायटी धारकाचं, शेतकऱ्याचं नुकसान व्हायला नको ही भूमिका आमची असल्याचे संबंधित अधिकारी वर्गाला या ठिकाणी ग्रामस्थ मंडळींनी सांगितले .
हा संघर्ष प्रकरण आम्ही संगमताने हाताळतो अशा पद्धतीची माहिती अधिकाऱ्यांना देत भूखंड मोजमाप करून दिलं नाही.
त्या अनुषंगाने येणाऱ्या रविवार पर्यंत पुरुषोत्तम भोईर यांच्या कार्यालया मध्ये पुढील बैठक समस्त गावकरी विधी तज्ञ व जाणकारांच्या उपस्थित न्यायिक लढ्यासाठी संपन्न होणार असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस राजेश केणी यांनी सांगितले.