दिवाळी निमित्ताने प्रतिकृती म्हणून प्रतापगड किल्ल्या सारखा हुबेहूब …विजय केणी
प्रतिनिधी पनवेल /साबीर शेख
श्रावण बाळ उर्फ विजय केणी करंजाडे (चिंचपाडा)येथील रहिवासी अनेक कला गुण आत्मसात असलेला अवलिया त्यांनी प्रतिकृती म्हणून
प्रतापगड किल्ल्या सारखा हुबेहूब किल्ला दिवाळी सणानिमित्त बनविला असल्याने लाखो नागरिकांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली

.इतिहासातिल संदर्भ
१६५६ मध्ये शिवाजी महाराजाने चंद्रराव मोरे यांच्या कडून हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर या डेरप्याचा डोंगराला मोरोजी पंतांना हा किल्ला बांधण्याची आदण्या दिली. व २ वर्षात म्हणजे १६५८ साळी हा किल्ला तयार झाला. या कारकिर्दीत अफजल खानानी ४०००० सैन्याने महाराजांना मारण्यास निघाले.
महाराजाने खानास आलिंगन घातले व प्राण घातक खाल्ला शिवाजी राजे वर केला गेला त . त्यांनतर महाराजांनी आपल्या हातात घातलेले वाघ नखे त्यांच्या पोटात घातली आणि खानाचा कोतला बाहेर काढला व त्यानंतर सय्यद बंडा खाणाच्या मदतीस आला व महाराजांवर वार करत असताच जिवा महलामध्ये आला. व सय्यद बंडाचे हात तोडले त्यामुळे तो तेथेच कोसळला व त्यामुळे जिवा मुले आपला राजा वाचला म्हणून एक म्हण तयार झाली.
होता जिवा म्हणून वाचला शिवा अशा इतिहासाचं माझ्या कलेतून किल्ल्याचं प्रतिकृती सादर करण्याचं मी प्रयत्न केला असल्याने अनेक नागरिकांनी माझ्या कार्याची दखल घेतल्याने मी सर्वांचा आभारी असल्याचे कलाकार विजय केणी यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.