पनवेल महानगरपालिकेच्यावतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करून प्रार्थना केली .
यावेळी सन्मानीय महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, महिला व बालकल्याण समिती सभापती मोनिका महानवर, नगरसेवक प्रकाश बिनेदार, अजय बेहरा, नगरसेविका चारूशीला घरत तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, सर्व अधिकारी, कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.