श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त बाळ गोपाळांचा पाळणा सजवून आदर्श मित्र मंडळातर्फे मोठ्या उत्साहात हा उत्सव पार पाडला…
प्रतिनिधी प्रेरणा गावंड
आदर्श मित्र मंडळ कामोठे यांच्या संयुक्त विद्यमानाने आई-बाबा गोविंदा पथक श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त बाळ गोपाळांचा पाळणा सजविला जातो म्हणून मंडळातर्फे गोविंदा आपल्या इच्छाशक्तीतून दरवर्षी पारंपरिक संस्कृतीच्या माध्यमातून दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडतात.
याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे नेते कामोठे कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांनी आदर्श मंडळाच्या गोविंद पथकांना सदिच्छा भेट देऊन भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना केली की दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तुझ्या आठवणीतून जो कोणी गोविंदा आपल्या आस्थथा,परंपरेने गोकुळाष्टमी दहीहंडी उत्सव साजरा करेल त्या सर्वांना सुखरूप ठेवून तुझा आशिर्वाद आम्हा सर्वांवर सदैव असाच राहू दे असे गौरव पोरवाल यांनी गोविंदा पथकांसाठी देवाकडे प्रार्थना केली व मनापासून सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या.
आदर्श मित्र मंडळ तर्फे शेतकरी कामगार पक्षाचे नेते गौरव पोरवाल यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला त्यावेळी त्यांनी भारतीय संस्कृती असलेल्या पारंपरिक दहीहंडी उत्सवात तरुणांना इच्छाशक्ती धाडस व संघटित होण्याची प्रेरणा मिळते.
आपण सर्वांनी मिळून अशीच एकता टिकून राहावी यासाठी सगळे प्रयत्न करून देश संस्कृतीतील प्रत्येक सण उत्सवाला एकत्र येऊन आनंदाने सण साजरे करू अशी ईश्वराकडे प्रार्थना केली.