खोपोली नगरपरिषद हद्दीत एक वेळ पाणीपुरवठा…

प्रतिनिधी खोपोली :
पाऊस लांबल्याने पाताळगंगा नदीमध्ये टाटा कंपनीमार्फत सोडण्यात येणाऱ्या पाण्याची वेळ कमी
करण्यात आली आहे. त्यामुळे खोपोली नगर परिषदेचे पाणी लिफ्टिंगचे पंप कमी वेळ चालवावे लागत आहे व परिणामी पाण्याचा साठा कमी पडत आहे.

सबब दिनांक 05/07/2022 ते
10/07/2022 या सहा दिवसात खोपोली नगरपरिषद हद्दीत एक वेळ पाणीपुरवठा होईल.

खोपोली शहराच्या विविध भागात पाणीपुरवठा च्या वेळा खालीलप्रमाणे राहतील.

सकाळी 6.15 ते 7.45
लवजी (जुनी लाइन), वासरंग (जुनी लाईन), सहकार नगर, भानवज गाव, गणेश नगर (नवीन
लाईन), मोगल वाडी, कारमेल हायस्कूल परिसर, सीता नगर, विद्या नगर व चिन्मय नगर

सकाळी 8.40 ते 10.20
शेडवली, चिंचवली, डीपी रोड, उदयविहार, श्रीराम नगर, लवजी (नवीन लाईन), शांतीनगर (नवीन
लाईन), मुळगाव (नवीन लाईन) समर्थ नगर (शिळ फाटा), व उमरजी पटेल नगर

सायंकाळी 4.15 ते 5.44
शिळ फाटा, शिळगाव, ताकई, आदोशी, पटेलनगर, मशजीद मोहल्ला, शांती नगर (जुनी लाईन),
मुळगाव (जुनी लाईन) व ताकई बौद्धवडा

सायंकाळी 6.15 ते 7.45
वरची खोपोली, खोपोली बाजारपेठ, खालची खोपोली, लक्ष्मीनगर, विहारी, मोहनवाडी, प्रकाश नगर,
सिद्धार्थ नगर, साईबाबा नगर, रहाटवडे, वासरंग बौद्धवाडा, सुभाष नगर, वीणानगर, क्रांतिनगर,
शास्त्रीनगर, कृष्णानगर (नवीन लाईन), वर्धमान नगर, विनानागर व काटरंग

नागरिकांना जनजागृती व्हावी यासाठी प्रत्येक विभागांमध्ये नगरपालिकेकडून संबंधित नियोजनाविषयी आव्हान केले जात आहे

नगर पालिका पाणी पुरवठा नियोजन अधिकारी  म्हणून संपर्क 
1) श्री. अशोक कांबळे – 9767151684
2)श्री. संजय चव्हाण
9764786521
9588468877

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.