सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने नोकरीची द्वारे खुली
| दिल्ली | वृत्तसंस्था |
दिव्यांगांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयपीएस, आरपीएफ नोकरी करण्याची करण्याची संधी देण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे त्यांना नोकर्यांसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे दिव्यांग उमेदवार 1 एप्रिलला दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. मात्र, हा अंतरिम आदेश असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानं दिव्यांगांसाठी ही आनंदाची बातमी आहे. दिव्यांग उमेदवारांना सेवेत घेतले जाणार की नाही? हे अंतिम आदेशावर अवलंबून असेल असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती अभय एस ओका यांच्या खंडपीठाने हा अंतरिम आदेश दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी दिला आहे. या निर्णयाचे दिव्यांगांकडून स्वागत करण्यात येत आहे.
