नवी मुंबई बचाओ – जागर जनजागृती च्या व्यासपीठावर विरोधी पक्ष नेते दशरथ भगत यांच आव्हान
नवी मुंबई/ प्रतिनिधी (साबीरशेख)
“नवी मुंबई बचाओ” या अभियान द्वारे नवी मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखडाबाबत नवी मुंबईकरांमध्ये जन – जागृती.
नवी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप विकास आराखड्या बाबत नवी मुंबईकर नागरिक अनभिज्ञ आहेत.
विकास आराखड्या बाबत नवी मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक प्रभाग निहाय मार्गदर्शन शिबीर रबवावे आणि या आराखड्यावर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी ६० दिवसांची अधिक मुदतवाढ द्यावी. अशी मागणी माजी विरोधीपक्ष नेते दशरथ भगत यांनी केली.
नवी मुंबई बचाव अभियाना अंतर्गत जागर जनजागृतीचा या उपक्रमाद्वारे नवी मुंबईतील प्रत्येक नोड मध्ये स्वाक्षरी मोहिम राबवत नवी मुंबईकरांना या व्यापक मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार या बाबत माहिती पत्रकार परिषदेत दिली.
९ ऑगस्टला नवी मुंबई मनपाने प्रारूप विकास आराखडा जाहीर केला व नियमाप्रमाणे हरकती सुचनाच्या साठी दोन महिन्यांचा कालावधी दिला. मात्र प्रत्यक्षात ज्याच्यासाठी हा आराखडा आहे त्यांना या बाबत काहीही माहिती नाही किंवा फार कमी लोकांना माहिती आहे. यात अनेक त्रुटी असून गावठाण एमआयडीसी बाबत स्पष्टता नाही, मोकळ्या भूखंड बाबत , शाळांची मैदाने, बेकायदा बांधकामे , भविष्यातील रस्ते आदी बाबत संदिग्धता आहे. पुनर्वसित आरक्षित भूखंड नकाशातून गायब आहेत. मात्र ही बाब बहुतांश नवी मुंबई कारांना माहिती नाही त्यामुळे सूचना हरकती अत्यल्प येतील . यात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा जेणेकरून प्रारूप आराखडा सर्वांना आपलासा वाटेल. मात्र या साठी मनपा कडे अनेक मागण्या केल्या आहेत. या मागण्याची प्रत ठाणे खासदार, ऐरोली व बेलापूर आमदार, जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आदींना पाठवण्यात आले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
दशरथ भगत (माजी विरोधीपक्ष नेता) यांनी नागरिकांच्या साठी आहे मनपाने जनजागृती करावी यासाठी आम्ही जागर जनजागृतीचा उपक्रम राबवणार आहोत २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान शहरातील विविध नोड मध्ये स्वाक्षरी अभियान, मुक्त चर्चा, नागरिकांच्या कडून हरकती सूचना घेणे, आदी उपक्रम असणार आहेत. तर ५ ऑक्टोबरला तारखेला लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
प्रमुख मागण्या..
हरकती सूचनेला मुदतवाढ मिळावीविकास आराखडा बाबत मनपाने स्वतः जनजागृती , मारदर्शन शिबिरे, प्रभाग निहाय घ्यावी ,प्रारूप विकास आराखडा इंग्रजी सह मराठीतून द्यावा शहरात बहुतांश लोकांना मराठी कळते मात्र इंग्रजी अत्यल्प लोकांना कळते.क्लिष्ट भाषा न वापरता सहज समजेल अशा भाषेत आराखडा द्यावा.
महासभा गठीत होईपर्यंत अंतिम आराखडा मंजूर करू नये, संविधान प्राप्त महासभेचा भंग करू नये,केंद्र व राज्य शासन आदेशीत शहर विकास करण्यासाठी नियोजन प्रमाणके आहेत त्याचे तख्त्या सहित तपशीलवार माहितीसह प्रेझेंटेशन सार्वजनिक प्रबोधन शिबिरात करावे,
स्वच्छ शहर अभियाना प्रमाणे जास्तीत जास्त लोकांचा सहभाग विकास आराखड्याच्या जनहक्काच्या विकासाच्या अत्यावश्यक असलेल्या सर्व आधारावर होण्यासाठी प्रयत्न करावे. असे पत्रकार परिषद मध्ये विरोधी पक्ष नेते दशरथ भगत व त्यांच्या जागर जनजागृती अभियानाच्या प्रसंगी असलेल्या शिष्टमंडळाने व्यक्त केले.