कोविड कालावधीत काम केलेल्या आरोग्य सेवकांना पद मुक्त न करता नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याकरीता फिरती ओ.पी.डी केंद्र सुरु करण्याची विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची मागणी

पनवेल : कोविड कालावधीत काम केलेल्या आरोग्य सेवकांना पद मुक्त न करता नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याकरीता फिरती ओ.पी.डी केंद्र सुरु करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी आयुक्तांकड़े निवेदनाद्वारे केली आहे.

               काही दिवसापासून कोविडमध्ये काम करणाऱ्या ए.एन.एम., जि.एन.एम., फार्मासिस्ट, आर.एम.ओ., लॅब टेक्निशियन अशा अनुभवी आरोग्य सेवकांना पदमुक्त करण्यात आले आहे. पालिकेच्या आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी अनुभवी आरोग्य सेवकांची आवश्यकता आहे. काही दिवसापूर्वी पालिकेच्या आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी ११ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले आहेत. सदरचे आरोग्य केंद्र अस्तित्वात येण्यासाठी काही कालावधी जाईल. पनवेल महानगरपालिका अस्तित्वात येताना २९ ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रत्येक घरापर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याकरीता महानगरपालिकेने फिरता बाह्य रुग्ण विभागाची निर्मिती करण्यात यावी. या करिता अनुभवी आरोग्य सेवकांची आवश्यकता लागणार आहे. तरी सद्या कोविड कालावधीमध्ये काम केलेल्या ज्या आरोग्य सेवकांना पदमुक्त केले गेले आहे. अशा आरोग्य सेवकांना वर्ग करून फिरती ओ.पी.डी हि संकल्पना सुरु करण्याकरिता सामावून घेण्यात यावे. जेणेकरून अनुभवी आरोग्य सेवकांचा नागरिकांना विविध आरोग्य सेवा देण्यासाठी उपयोग होईल, तरी तातडीने उपरोक्त विषयावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक  गणेश चंद्रकांत कडू, नगरसेविका डॉ.सुरेखा विलास मोहोकर, सारिका अतुल भगत, प्रिती जॉर्ज म्हात्रे यांनी पनवेल आयुक्तांकड़े केली आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.