थैलासीमिया आजाराने ग्रस्त असलेल्या लहान मुलांकरिता मुस्लिम वेल्फेअर ट्रस्ट मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन…
प्रतिनिधी साबीर शेख
खोपोली – मुस्लिम वेल्फेअर ट्रस्ट व समर्पण ब्लड बँक मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दि.27 ऑगस्ट रोजी
मुस्लिम कम्युनिटी हॉल पंत पाटणकर चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात 139 रक्तदात्यांनी रक्तदान केल असून थैलासीमिया आजाराने ग्रस्त असलेल्या लहान मुलां करीता रक्ताची गरज असल्या कारणाने मुस्लिम वेल्फेअर ट्रस्ट मार्फत तातडीने शिबिराचे आयोजन केले होते.
सदरील कार्यक्रमाला खोपोली शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून भेट घेत कार्यक्रमाचे कौतुक केले.
रक्तदान शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी खोपोली मुस्लिम वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष अतिक खोत यांच्या नेतृत्वाखाली निजामुद्दीन जळगावकर , अबू जळगावकर , अब्दुल कोरबू , मुस्तफा दुस्ते , नईम मुकरी , जेरान नूर , अझीम कर्जिकर , इलियास मणियार , रशीद शेख , हनीफ मुल्ला , मुनाफ कागदी , सलीम चौहान , साबीर गोरी , इरफान परमार , समीर शेख , साजिद शेख यांनी मेहनत घेत रक्तदान शिबीर यशस्वी संपन्न केला…