शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी हनुमान जयंती निमित्त भंडारा व इफ्तार पार्टीचे आयोजन
राज्यात सर्वत्र मशीदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा याबाबत वादविवाद सूरु असताना शिवसेना पनवेल पालिका शहर क्षेत्रातर्फे एकाच मंडपाखाली हनुमान जयंतीचा भंडारा आणि रमजान महिन्यातील इफ्तार पार्टीचे आयोजन शनिवारी कळंबोली वसाहतीमधील बिमा काॅम्पलेक्सच्या मारुती मंदीरात करण्यात आली. शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी हा उपक्रम राबविला.
या उपक्रमांत लोखंड बाजारातील सय्यद हवालदार व फारुक हाजी यांच्यासारखे व्यावसियांकासोबत सूमारे ५० मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला. मंदीराच्या आवारात इफ्तार पार्टी झाल्यावर मुस्मिम बांधवांनी हनुमान मंदीरातील आरतीमध्ये सहभाग घेऊन चक्क आरती ओवाळली.
या उपक्रमात नवी मुंबई पोलीस दलाचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील व वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पाटील यांच्या उपस्थितीत साजरा झाला.