सोमवार 20 डिसेंबर रोजी महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे महासभा घेण्यात आली. महानगरपालिकेमधील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या कागदपत्रांची छाननी करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेल्या प्रतीक्षा यादीतील एकुण 16 वारसांदरांना अनुकंपा तत्वावर पालिकेच्या सेवेत रूजू करण्याचे पत्र आजच्या महासभेत महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, सभागृहनेते परेश ठाकूर, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसचिव तिलकराज खापर्डे, सर्व नगरसेवक, पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या मालकीच्या मलनि:स्सारण वाहिन्या व भुमिगत गटारांची दोन वर्षाकरीता दुरुस्ती, सुधारणा व नुतनीकरण्याच्या विषयास आणि कोरोनाच्या पार्श्वभमीवर पालिकेच्या मालकिचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातील दैनंदिन भाडे दरात 75% सवलत मिळणेबाबतचा विषय महासभेत मंजूर करण्यात आला.

पालिका हद्दीतील प्रभाग समिती “अ” खारघर, प्रभाग समिती “ब” कळंबोली , प्रभाग समिती “क” कामोठे प्रभाग कार्यालयाची उभारणी करणेबाबतच्या ठरावास महासभेने मंजूरी दिली.

महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती “अ”,  खारघर, प्रभाग समिती “ब”, नविन पनवेल, प्रभाग समिती “ड”,  काळुंद्रे येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम करण्याच्या विषयास मंजूरी देण्यात आली. तसेच खारघर येथे महापौर यांचे निवासस्थान बांधणेच्या मान्यता मिळणेबाबत या विषयांना मंजुरी मिळाली.

पनवेल महानगरपालिकेकरीता कार, जीप, इनोव्हा, रिक्षा, बस, टेम्पो, ट्रक वाहने वाहनचालकासह 03 वर्ष कालावधीकरीता भाडेतत्वावर घेणेकामी या विषयास सर्व साधारण सभेने मान्यता दिली.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील, खारघर नोड “नो हाँकिंग झोन”  (नो हॉर्न) निर्माण करणे, विविध ठिकाणी हजेरी बुथ करीता कंटेनर केबिन खरेदी करुन बसविणेबाबतच्या विषयास महासभेने मंजूरी दिली.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील करणेत येणाऱ्या अंत्यविधिसाठी धोरण निश्चित करताना गॅस दाहिनीला नागरिकांनी प्राधन्य देण्यासाठी गॅस दाहिनी 100 रू व लाकडावरील अंत्यविधीला 2500 दर निश्चित करण्यात आला.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये 2 वर्षांकरिता पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरविणे, सर्व गावे, पनवेल शहर पाणीपुरवठा योजनेच्या परिचालनासाठी तीन वर्षाकरिता मनुष्यबळ पुरविणे व निगा दुरुस्ती करण्याचा विषय महासेभेने मंजूर केला. तसेच नव्याने समाविष्ट 29 गावे व वाड्या अंतर्गत पाणी पुरवठा वितरण व्यवस्था करणे या कामाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता मिळण्याच्या विषयास महासभेने मंजूरी दिली.

पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये शहरातील महत्वाच्या मोठ्या रस्त्यांची तसेच द्रुतगती मार्गांची आधुनिक पध्दतीने साफसफाई करणेकरिता स्वीपिंग मशीन खरेदी करणे, खारघर मध्ये उद्यान विकसित करणे अंतर्गत विरंगुळा केंद्र उभारण्याबाबतचे विषयास मंजुरी मिळाली.

पनवेलमधील स्वामी नित्यानंद रोड वरील काँक्रिट रोड, रस्ता रुंदीकरणासह पावसाळी गटार बांधणे, फूटपाथ बांधणे आणि इतर अनुषंगिक कामे करण्याच्या विषयास महासभेने मंजूरी दिली.

महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग अ, ब, व क ची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास मान्यता मिळण्याबाबतच्या विषयास महासभेने मंजुरी दिली.

तसेच पाचव्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या छायाचित्रण स्पर्धा आणि माझी वसुंधरा अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.