पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अभिजित पां. पाटील यांची निवड….

प्रतिनिधी प्रेरणा गावंड :-

कॉंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आशिर्वादाने आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अभिजित पाटील यांची निवड करण्यात आली.

कॉंग्रेस विचारसरणीशी बांधिलकी मानणारी आमची तिसरी पिढी. कधीच पदाच्या अपेक्षेने काँग्रेस पक्षाचे कार्य पाटील कुटुंबातील कोणी सदस्यांनी केलं नाही.
राजकीय पद हे साध्य नसून विचार रुजवण्याचं साधन आहे अशा भूमिकेतून आम्ही  सर्व काँग्रेस पक्षाकडे पाहतो.
देशातील विद्यमान फॅसिस्ट वातावरणात आज हा पुरोगामी, निधर्मी विचार पुनःश्च पसरवण्याची नितांत आवश्यकता लोकतंत्रात आहे. मी आणि माझे सहकारी त्यासाठी शक्य त्या पातळीवर अथक प्रयत्न नेहमीच करत असतो , भविष्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षश्रेष्ठी मला सदैव  निरंतर बळ देतील यात मला कणभरही शंका नाही. पक्ष अडचणीच्या काळातून जात असताना माझ्या खांद्यावर ही जबाबदारी येणं ही माझ्यावर असलेल्या विश्वासाची पोचपावती समजतो असे अभिजित पां. पाटील त्यांनी नियुक्ती नंतर मत व्यक्त केले.
पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या गटात ह्या नियुक्ती मुळे नवचैतन्य निर्माण झाल्याने अभिजीत पाटील यांना संघटने च्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून  राजकीय वाटचालिसाठी शुभेच्छा व अभिनंदन  होत आहे.

——//////— जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 8805288798

Share this...
One thought on “पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अभिजित पां. पाटील यांची निवड….”

Leave a Reply

Your email address will not be published.