पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचे कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लसींचे लसीकरण पुर्ण करण्यांकरिता पालिकेच्या सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने भोंगा गाडी व त्या सोबत लसीकरण वाहिका (वॅक्सीनेशन व्हॅन) सर्वत्र फिरणार आहेत. ज्या नागरिकांचे अजूनही पहिल्या डोसचे विहीत कालावधीनंतर दुसऱ्या डोसचे लसीकरण राहीले आहे त्यांनी आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
पालिका क्षेत्रात पहिल्या डोसचे लसीकरण १०० टक्के झाले असले तरी दुसऱ्या लसीचे लसीकरण अद्याप पूर्ण झाले नाही. या उपक्रमांतर्गत महापालिका क्षेत्रातील विविध सोसायट्यांमधील ज्या नागरिकांचे लसीकरण राहीले आहे अशा नागरिकांनी भोंगा गाडीजवळ येऊन लसीकरण वाहिकेमध्ये आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
कोविड रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून नागरिकांनी मास्क सुरक्षित अंतर, वारंवार हात धुणे या तिन्ही गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे.