खासगी रूग्णालये अधिक दर आकारत असल्याच्या तक्रारी येत असल्याकारणाने, रूग्णालयातून पुरविण्यात येणाऱ्या सुविधेचे दरपत्रक 72 तासांमध्ये रुग्णालयाच्या दर्शनी भागात प्रदर्शित करून महापालिकेला अहवाल सादर करण्याच्या नोटीसा महापालिकेने 240 रूग्णालयांना दिल्या आहेत. महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी नियम 1973 (सुधारित)नुसार सर्व रूग्णलयांनी दर्शनी भागात वैद्यकिय सुविधांचे दरपत्रक लावणे बंधनकारक आहे.
जी रूग्णालये या नियमाची पूर्तता करणार नाहीत त्यांच्यावर बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट 1949 नुसार महापालिकेच्यावतीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल.