पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशान्वये आज महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कामोठे आणि घोटगाव येथील अनधिकृत बांधकामांवर मोठी धडक कारवाई करण्यात आली.

गेल्या काही काळापासून महापालिका क्षेत्रातील घोट गाव येथे अनधिकृत बांधकामांमध्ये वाढ होताना दिसत असल्याने आयुक्तांच्या ओदशानूसार ,उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोठी धडक कारवाई करून अनधिकृत बांधकामे निष्कांसित करण्यात आली. यामध्ये दोन घरे, नऊ दुकाने जमीन दोस्त करण्यात आले. जेसीबी तसेच मोठा पोलिस फौज फाटा सहीत ही कारवाई करण्यात आली.

यावेळी सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, प्रभाग समिती ‘अ’ चे प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी, प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे , प्रभाग ‘अ’ चे सर्व स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

तसेच कामोठे येथील सेक्टर 18, 22, 35, 36 येथील अनधिकृत झोपड्या, अनधिकृत टपाऱ्या यांच्यावर मोठी धडक कारवाई करण्यात आली. जेसीबी, पोलिस फौज फाटा सहीत सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, प्रभाग अधिकारी अरविंद पाटील, अतिक्रमण पथक प्रमुख व दोन्ही शिफ्ट चे कर्मचारी, पोलीस कर्मचारी व प्रभाग कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते सदर कारवाई सकाळी ११ वाजता चालू केले असून सायंकाळी ५ पर्यंत चालू होती.

कामोठे येथील कारवाई खालील प्रमाणे-

१. खांदेश्वर स्टेशन समोरील खाली प्लॉट येथे झोपडपट्टी व नर्सरी जेसीबीद्वारे पाडण्याचे काम करण्यात आले.

२. किया शोरूम भूमी लँडमार्क सोसायटी समोरील मोकळ्या प्लॉटमध्ये पान शॉप व इतर दुकाने झोपडे जेसीबीद्वारे पाडण्याचे काम करण्यात आले.

३. सेक्टर 22 सिडको मार्केट येथील वडापाव दुकाने ,चायनीज गाडी ,भाजीपाला दुकाने अतिक्रमण कारवाईमध्ये जेसीबीद्वारे तोडण्यात आले.

४. उरण एक्सप्रेस हायवे हावरे निर्मिती सोसायटी जवळ गॅरेज धंदे यांचे शेड जेसीबी द्वारे पाडण्याचे काम करण्यात आले.

५. सेक्टर 20 सेंट्रल बँक समोरील मोकळ्या प्लॉटवर भंगारवाला दुकाने तोडण्यात आले.

६. सेक्टर 24 तिरुपती आर्केड येथील ऑटो सेन्स यांनी केलेले अनधिकृत बांधकाम दुकानासमोरील रॅम्प पाडण्याचे काम करण्यात आले

७. सेक्टर 34 मानसरोवर स्टेशन रोड मानस बिल्डिंग समोरील अतिक्रमण झोपडपट्ट्या पाडण्यात आल्या.

८. सेक्टर 36 शिवसेना शाखा येथील भंगारवाले व इतर व्यवसायाकरता उभारलेले झोपडे जीसीबीद्वारे पाडण्यात आले.

९. ऐश्वर्या हॉटेल सेक्टर 10 येथील मोकळ्या प्लॉटवरील अतिक्रमण चिकन व्यवसाय व इतर धंदे यांनी उभारलेले झोपड्या जेसीब द्वारे पाडण्यात आल्या.


Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.