पनवेल शिवसेनेला धक्का ! रामदास शेवाळे यांचा शिवसेनेला जोर का झटका

पनवेल शिवसेनेला धक्का ! रामदास शेवाळे यांचा शिवसेनेला जोर का झटका

कळंबोली वृत्त / () :

सेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सेनेत बंडखोरी केल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले .रायगड मधील ही तीन आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांची साथ दिली .पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा गट आहे. पनवेलमधील सेनेचे महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनीही सेनेला जय महाराष्ट्र करीत आपण एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याचे जाहीर केले आहे .माझ्या सोबतच अनेक पदाधिकाऱ्यांनी व हजारो शिवसैनिक हे एकनाथ शिंदे सोबत येतील असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे पनवेलमध्ये सेनेला जोर का धक्का दिला आहे. राज्यात शिंदेच्या बंडाचा परिणाम सेनेची पडझड मोठ्या प्रमाणात होण्यात झाली .तब्बल 46 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने सेनेला जोर का झटका राज्यभर लागला असल्याचे दिसून आले आहे .पनवेल तालुक्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा गट आहे एकनाथ शिंदे यांच्या नेहमी संपर्कात असणारे सेनेचे पनवेल महानगर पालिका प्रमुख रामदास शेवाळे यांनीही आपण एकनाथ शिंदे सोबतच असल्याचे जाहीर करून सेनेला जोरका झटका दिला आहे. रामदास शेवाळे यांनाही पनवेल तालुक्यात मानणारा चांगला गट आहे. त्यांच्या समवेत अनेक शाखाप्रमुख व हजारो शिवसैनिकही असल्याचा दावा त्यांनी केला असून लवकरच तेही शिंदे यांच्या समवेत येतील असा त्यांनी दावा केला आहे. लवकरच एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे रामदास शेवाळे यांनी सांगितले आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.