मेथ एम्फेटामाइन याबा नामक अंमली पदार्थ विक्री गुन्ह्यात घुसखोर बांगलादेशी नागरीकास पनवेल तालुका पोलीसांकडुन अटक
पनवेल, दि.21 () ः देशात अमली पदार्थ विक्री करणे गुन्हा असताना अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी घुसखोर बांगलादेशी नागरिक राज्यात अनेक शहरात बेकायदेशीर व्यवसाय मांडून बसले पण देशातील ,राज्यातील पोलीस यंत्रणा देशविरोधी गुन्ह्यावर अंकूश ठेवून आहे .
पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे व.पो.नि रविंद्र दौंडकर यांच्या आदेशानुसार दि.१८/०२/२०२२ रोजी रायगड जिल्ह्यातील खारपाडा गाव , आपटा फाटा येथून घुसखोर बांगलादेशी आरोपीस ताब्यात घेतले असून त्याच्या अटकेमुळे मोठ्या प्रमाणात मेथ एम्फेटामाइन याबा नामक अंमली पदार्थाचे विक्री करणार्यांचे रॅकेट उघडकीस होतील असा अंदाज आखला जात आहे .
पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, पोलीस सह आयुक्त डॉ.जय जाधव, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) महेश घुर्ये, यांनी नवी मुंबई शहर नशामुक्त करण्याचे व अंमली पदार्थ सेवन व विक्री करणा – या इसमाविरूध्द कायदेशीर कारवाई करण्याचे कठोर आदेश आहेत . त्यानुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे व.पो.नि रविंद्र दौंडकर यांना सूत्रधारा कडून माहिती मिळाली की आपटा फाटा , खारपाडा , या ठिकाणी आरोपी मुसा सुलतान खान वय २५ वर्षे , व्यवसाय करण्यासाठी येणार आहे . त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले, त्याचेकडुन खालील प्रमाणे अंमली पदार्थाच्या साठा हस्तगत करण्यात आला . एकुण किमंत १३,२५,००० / – रू वर्णन मेथ एम्फेटामाइन याबा नामक अमली पदार्थाच्या एकुण ५४.१८० ग्रॅम वजनाच्या ५३० गोळया सदर इसमाच्या ताब्यात बनावट आधार कार्ड , पॅनकार्ड , जन्मदाखला मिळून आलेले आहे . तो नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनधिकृतरित्या राहत असुन त्याने वैध प्रवासी कागदपत्राशिवाय अवैध मार्गाने भारत – बांग्लादेश सीमेवरील मुलकी अधिका – याच्या परवानगीशिवाय भारतात घुसखोरी करून प्रवेश केला तसेच भारतीय नागरीकांना देण्यात येणा – या व नमुद वर्णनाच्या बनावट कागदपत्राच्या आधार घेवून खरी असल्याचे भासवून शासनाची फसवणुक केल्याने त्याचेविरूध्द पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.क्र . ३६/२०२२ कलम एनडीपीएस अॅक्ट १९८५ चे कलम ८ ( क ) , 22 ( क ) सह , भादविसं कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ सह पारपत्र ( भारतात प्रवेश ) नियम १९५० चे कलम 3 (अ ), ६ ( अ ) , परकिय नागरिकांचा कायदा १९४६ चे कलम १४ ( अ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . अटक आरोपीस मा . प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी , पनवेल यांनी ७ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुरी दिली आहे. पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह , पोलीस सह आयुक्त जय जाधव , पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील , परिमंडळ 2 , पनवेल , भागवत सोनवणे , सहा . पोलीस आयुक्त , पनवेल विभाग , नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौडकर , गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरिक्षक संजय गळवे , पो.हवा . विकास साळवी , पो . हवा महेश धुमाळ , पोहवा सुनिल कुदळे , पोहवा अजित म्हात्रे , पोना पंकज चंदिले , पोना प्रकाश मेहेर , पोना जयदीप पवार , पोशि प्रविण पाटील , पोशि यादव गावीत या पथकाने केलेला आहे . सदर गुन्हयाचा तपास पनवेल तालुका पोलीस ठाणेमार्फत चालु आहे .