यह गंगा जमुनी तहज़ीब बनी रहें ! यह अक्षय तृतीया और ईद उल फित्र देश में प्यार महोब्बत का पैंगाम लायें । सौहार्द, शांति, भाईचारासदा कायम रखे , यही दुवा है जिसकी इस मुल्क को सख्त जरूरत है ! *आमीन* …सय्यद अकबर
*अक्षय तृतीया और रमजान ईद की ढेर सारी शुभकामनाएं*
*भाजप नेते पत्रकार सय्यद अकबर यांच्यामुळे पनवेलकरांचा ईदचा उत्साह द्विगुणित*
प्रतिनिधी साबीर शेख
पनवेल महानगरपालिका भागात मोठ्या उत्साहात व शांततेत रमजान ईद साजरी झाली.नवीन पनवेल दारूल अमन मस्जिद जवळ भाजप नेते पत्रकार सय्यद अकबर यांनी गुलाब पुष्प व रुमाल वाटप करून सर्वांचा आनंद द्विगुणित केला.
नवी मुंबई परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे,खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी देखील सय्यद अकबर यांच्या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. ईदीच्या निमित्ताने अशाप्रकारे कार्यक्रम राबवून एक चांगली परंपरा निर्माण केल्याचे शिवराज पाटील म्हणाले. हजारो मुस्लिम बांधवानी नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सय्यद अकबर आणी पोलीस अधिकारी यांच्या नव्या पद्धतीने केलेल्या स्वागताने सर्वजण भारावून गेल्याचे दिसत होते.
नवीन पनवेल दारूल अमन मस्जिदचे मुफ्ती हुजेफा, सेक्रेटरी हमीद इनामदार,व्यवस्थापन समितीचे सलीम खान,हरून रशीद शेख,मेहराज शेख यांनी देखील गुलाब पुष्प व रुमाल वाटप कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
अमन अख्तर, साबीर शेख,गणपत वारगडा,शंकर वायदंडे,अमजद खान आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात विशेष परिश्रम घेतले.