पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत चित्रकला, पोस्टर जिंगल, गाणी, व्हिडीओ, शॉर्ट फिल्म, पथनाट्य, भिंतीचित्र स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी या स्पर्धेत उत्स्फुर्त सहभागी होऊन स्व्च्छता विषयक जनजागृतीमध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन पालिकेने केले आहे.

स्पर्धेसाठीचे विषय

1.स्वच्छ सुंदर आधुनिक पनवेल शहर संकल्पना,

2. माझी वसुंधरा अभियान,

3.घनकचरा व्यवस्थापन(कचरा वर्गीकरण व कचरा प्रक्रिया)

4.प्लास्टिक प्रदूषणाचे परिणाम,

5. हागणदारी मुक्त पनवेल शहर,

6. कचरा पुर्नचक्रीरण पुर्नवापर कमी करणे नाविन्यपूर्ण संकल्पना व प्लासि्टक बंदी (3 आर, रिड्युस,रियुझ्,रिसायकल)

ऑनलाईन पध्दतीने नागरिकांनी या स्पर्धेसाठी प्रवेश नोंदवायचा असून 25 डिसेंबर पर्यंत स्पर्धकांनी आपले अविष्कार पाठवायचे आहेत. या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. प्रवेशिका भरताना ओळखपत्र भरणे आवश्यक आहे.या स्पर्धेत ग्रुपनेही सहभागी हाता येईल. सर्व स्पर्धकांनी आपले अविष्कार दोन कॉपीमध्ये डीव्हीडी मध्ये स्वच्छ भारत अभियान कक्ष, दुसरा मजला अग्निशमन इमारत, पनवेल महानगरपालिका येथे किंवा ऑन लाईन पध्दतीने जमा करावी.

सदर स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम येणाऱ्या तीन विजेत्यांना अनुक्रमे 3000, 2000, 1000 रुपयांचे पारितोषिक ,प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचा निकाल 5 जानेवारी 2022 पर्यंत वैयक्तिक ईमेल व्दारे तसेच पालिकेच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून कळविण्यात येईल.

प्रवेश निश्चित करण्यासाठी दिलेल्या क्यू आर कोड स्कॅन करण्यात यावे. तसेच अधिक माहितीसाठी swachhpanvel.compettion@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा किंवा स्वच्छ भारत अभियान कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.