पनवेल खांदा कॉलनी सेक्टर १० येथील फिनिक्स मल्टीस्पेशालिटी स्पेशलिस्ट रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र खाडे व डॉ. श्रीराम नावडे यांच्या फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे उद्घाटन भाजपा राष्ट्रीय सचिव तथा माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

आरोग्य सेवा देणारे डॉ. राजेन्द्र खाड़े ह्यांची मि सदैव ऋणी आहे. आमचे दैवत स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यावर निस्वार्थ पणे प्रेम करणाऱ्या पैकी डॉ. खाडे आहेत.  जी व्यक्ति मुंडे परिवारावर निस्वार्थ प्रेम करतात व रुग्ण सेवा देशसेवा समजून करतात अश्या सर्व लोकांची मि ऋणी व आभारी आहे असे उदगार उद्धघाटन प्रसंगी पंकजा मुंडे भावुक होऊन म्हणाल्या.  प्रत्येक व्यक्तीने आपलं काही सामाजिक ऋण आहे म्हणून आपल्या उत्पन्नातील, संपत्तीतील काही हिस्सा देश, समाजहितात खर्च करावा, शोषित, वंचित लोकांसाठी पर्याय म्हणून जगावे . आपण सर्व भारतीय जगाहुन वेगळे आहोत व आपली कुठेतरी समाजाशी नाळ जोडलेली आहे. समाजातील प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे अशी मानसिकता ठेवून परोपकाराची भावना  सदैव आत्मसात करावी .स्व. मुंडे साहेबांनी तुम्हाला आम्हाला जे विचार, जे संस्कार दिले त्यातून आज आपण एक परिवार म्हणून जोडलो गेला आहे म्हणून आज माझ्यासमोर आपल्यासारखी मनाने प्रेम करणारी असंख्य लोक मुंडे साहेबांच्या प्रेमापोटी माझ्यासोबत सदैव पाठीशी आहेत. देवाकडे मी जास्त काही मागणार नाही ज्या व्यासपीठावर मी असेल त्या व्यासपीठावर मुंडे साहेबांन वर प्रेम करणारी असंख्य मंडळी माझ्यासमोर उपस्थित असावी मि माझं पूर्ण आयुष्य  देश ,समाजासाठी समर्पित करत आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद व प्रेम सदैव माझ्या पाठीशी असेल असा मला विश्वास आहे अशी मि मुंडे परिवार म्हणून नेहमी आपल्या कडून  अपेक्षा ठेवते.

कोरोना काळात रुग्णांची सेवा केल्यानंतर सर्वसामान्यांच्या आरोग्य सोयीसाठी पनवेल येथे रुग्णांना योग्य दरात आरोग्य उपचार मिळावे म्हणून लोकांच्या विश्वासाला साथ देत ५० बेडचे आधुनिक सुविधा तंत्रज्ञान असलेले रुग्णालय आम्ही पनवेल करांसाठी चालू करत आहोत . आमच्या वरील विश्वास आम्ही नेहमी आमचे कर्तव्य म्हणून योग्य विश्वसनीय आरोग्य सेवा देऊन करु असे डॉ. राजेंद्र खाडे यांनी मत व्यक्त केले .  कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या विश्वास , मार्गदर्शन व सहकार्यामुळे आज आम्हाला अभिमान वाटतो की कोरोना काळात प्रथम को कोविड रुग्णालय चालू करण्यासाठी त्यांनी आम्हाला प्राधान्य दिले .

संत श्री.वामन भाऊ व संत श्री. भगवान बाबांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व देश कार्यात आपल्या सर्वाना यश प्राप्त होईल .  आम्ही मानव हितार्थ सदैव संघर्ष करु त्यासाठि आपली साथ सदैव राहो अशी अपेक्षा ठेवून रुग्णालयाच्या पूर्ण सहकार्याच्या वतीने मि उपस्थित वर्गाचे आभार मानतो.

प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटनप्रसंगी माजी ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे ,माजी मंत्री महादेव जानकर, पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर , माजी म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील ,कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांची कन्या हर्षदा देशमुख , नगर सेविका सीता ताई पाटील, नगर सेवक एकनाथ गायकवाड , नगर सेवक तेजस कांडपिळे तसेच हॉस्पिटल चे प्रमुख संचालक डॉ. राजेंद्र खाडे ,डॉ. सौ. अश्विनी खाडे ,डॉ. श्रीराम नावडे, डॉ.सौ.विजेता नावडे तसेच संपूर्ण फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे वैद्यकीय स्टाफ आरोग्य कर्मचारी,अनेक क्षेत्रातील मान्य वर तसेच पत्रकार वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.