तपासी अंमलदार कक्षाची निर्मिती व नूतनीकरण करण्यात आलेल्या कक्षाचे उद्घाटन रायगडचे अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते ..

प्रतिनिधी,(वार्ताहर)

खोपोली शहरातील प्रत्येक तक्रारदाराला न्याय मिळावा त्यांची तक्रार कायदेशीर रित्या नोंद व्हावी म्हणून पोलीस ठाण्यात तपासी अंमलदार कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या नूतनीकरण करण्यात आलेल्या कक्षाचे उद्घाटन रायगडचे अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर संजय शुक्ला, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरिष पवार यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

खोपोली पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक पदाचा धुरा पोलीस अधिकारी शिरिष पवार यांनी घेतल्यानंतर खोपोली शहरातील कायदा सुव्यवस्था नीट ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक शिरिष पवार व त्यांच्या सर्व सहकारी वर्गानी मोठी मेहनत घेतली आहे. पोलीस निरीक्षक पवार हे कायदा सुव्यवस्था नीट ठेवण्याबरोबर पोलीस ठाणे परिसरातील गोरगरिबांना मदतीचा हात देत सामाजिक बांधीलकी ही जपण्याचे कार्य ही करीत आहेत. त्याचबरोबर खोपोली पोलीस ठाण्याचा चेहरामोहरा बदलला आहे. तपासी अंमलदार यांना प्रशस्त कक्ष तयार व्हावे ज्या कक्षातून काम करताना त्यांना उत्साहित ,सकारात्मक वाटावे आणि त्यांच्या  कार्याच्या दृष्टीने अनेक नोंद असलेल्या तपास कामात वेगाने बदल व्हावा या हेतूने कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.