खारघर शहर शिवसेना युवक रोजगार व स्वयंरोजगार तर्फे रोजगार मेळावा..
प्रतिनिधी :-(साबीर शेख)दि. 26 फेब्रुवारी
कोरोनाच्या महामारीत प्रचंड प्रमाणात निर्माण झालेल्या बेरोजगारिला आळा घालण्यासाठी खारघर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रोजगार संधी उपलब्ध व्हावी व प्रत्येक व्यक्ती ,परिवार आर्थिक सक्षम असावा . समाजात सगळयांना जगण्याचा हक्क असावा म्हणून आपले सामाजिक कर्तव्य म्हणून शिवसैनिकांनी नियोजन बद्ध रोजगार मेळाव्याचे नियोजन केले होते .
जॉब फेअर सुवर्णसंधी म्हणून खारघर सेक्टर 35 ग्रँड लोटस बँनक्वेट हॉल ओवे गाव येथे कार्यक्रम आयोजित केले होते.
शैक्षणिक पात्रता ८ वि ते पदवीधर असावी म्हणून अठ ठेवण्यात आली होती , गरजू व्यक्तींना नोकरी मिळण्याची संधी मिळावी हाच एकमेव उद्देश शिवसेना पक्षा कडून असून, कार्यक्रमाला अंदाजे अडीशे हुन जास्त गरजूंनी बेरोजगारांनी हजेरी लावून आपली पात्रता चाचणी परीक्षा दिली . त्यातील 100 हून जास्त गरजूंनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून नोकरी प्राप्त केली.
रोजगार उपलब्ध करून देण्यात शक्य ते नियोजन करण्यात आले होते . बेरोजगार युवकांना चांगल्या कंपनीत जॉब मिळवता यावं म्हणून खारघर शहर ,युवक रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या शिवसैनिकांना खूप मेहनत घेतली होती .
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिरीष घरत,दीपक घरत ,नंदू शेठ महानगर प्रमुख रामदास शेवाळे, विभाग प्रमुख इम्तियाज शेख,उपविभाग प्रमुख मंगेश रणावडे,काळीद एम .के.ग्रुप दीपक काळीद,अनिल चव्हाण,उद्योजक अफझल शेख ,खारघर तळोजा वेल फेअर असोसिएशन सदस्य ,खारघर स्थानिक सहकारी तसेच अन्य पदाधिकारी , शिवसैनिकांनि मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
नामांकित उद्योग समूह म्हणून महिंद्रा फायनान्स, अक्सिस बँक,इरेका ‘फोर्ब्स’,पे टीम,रेडिओ,मिशो,झोमॅटो,स्वीगी,आयसी आयसी बँक, अश्या अनेक उद्योग समूहांच्या सहकार्याने ही रोजगार संधी उपलब्ध झाल्याने त्या सर्व उपस्थित उद्योग समूह व्यवस्थापक वर्गाचे खारघर शिवसेना पक्षा कडून आभार मान्यता आले.