खोपोली पोलिस ठाणे हद्दीतील विहीरी गावामधील शुबो शक्ती सरदार वय 11 वर्षीय अल्पवयीन दिव्यांग मुलाचा शोध…
प्रतिनिधी खोपोली
दि. 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने फुस लाऊन पळवून नेल्याची घटना खोपोली शहरात घडली असून अल्पवयीन मुलाची आई लक्ष्मी शक्ती सरदार वय 30 यांनी खोपोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलांच्या आईने मुलाला मोबाईल दिला नाही या कारणाने मुलाने मानत राग घेऊन सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घरा बाहेर टॉयलेट ला गेला असता घरा बाहेर पडणार्या मुलाला अज्ञात इसमाने फुस लाऊन पळवून नेल्याची शंका मुलाच्या आईने पोलिस ठाण्याला दिली आहे. सदरील गुन्हा गु.र.नं 3 / 2022 भा.द.वी. 363 प्रमाणे नोंद असून पुढील तपास आर.सी. भोईर पोह/ 708 मोबाईल नंबर 8208545486 यांच्या कडे आहे..
अल्पवयीन मुलगा शुबो शक्ती सरदार याचे वर्णन पुढील प्रमाणे
वय 11 , उंची 4 फुट , रंग – सावळा , बांधा सडपातळ , केस काळे लांब , चेहरा उभट , अंगावर निळ्या रंगाची बरमुडा , पिवळ्या रंगाचा टीशर्ट , कमरेला दोन तवीज , उजव्या गुडघ्यावर जन्मखूण , चालताना उजवा हात, पाय, मन एक बाजूला झुकते , काळ्या रंगाची स्लीपर प्रमाणे असून कोणाच्या नजरेत पडल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा लक्ष्मी सरदार – 7709066457 किंवा खोपोली पोलिस ठाणे नंबर 02192-263333/ 8208545486यावर संपर्क साधा…