खोपोली शहरात हर घर तिरंगा अभियान मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला

हर घर तिरंगा उपक्रमाच्या जनजागृती करिता खोपोली नगरपरिषदे मार्फत प्रभातफेरीचे आयोजन… 5 हजार विद्यार्थ्यांसह 3 हजार नागरिकांचा सहभाग…

प्रतिनिधि /खोपोली ( प्रेरणा गावंड)

खोपोली – देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे याकरिता जनतेच्या मनात स्वतंत्र लढ्याची स्मृति रहावी याकरिता मा. केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार हर घर तिरंगा उपक्रमाच्या जनजागृती करिता मा.जिल्हाधिकारी , रायगड – अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली व खोपोली नगरपरिषदेच्या वतीने शासनाच्या हर घर तिरंगा या उपक्रमाविषयी नागरिकांमध्ये प्रचार , प्रसार व जनजागृती होण्याच्या दृष्टीने खोपोली नगरपरिषद , शैक्षणिक संस्था , राजकीय पदाधिकारी , इतर सामाजिक संस्था व नागरिकांच्या वतीने सोमवार दि. ०१ ऑगस्ट २०२२ रोजी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.

हर घर तिरंगा अभियान खोपोली नगरपालिका अंतर्गत

सदरील प्रभात फेरी जनता विद्यालय खोपोली क्रीडांगण येथून सकाळी 9 वाजता काढण्यात आली असून प्रभातफेरी मध्ये अंदाजे ५००० विद्यार्थी तर ३००० हजार सामाजिक , राजकीय , इतर संस्था पदाधिकारी , नगरपरिषद कर्मचारी व नागरिकांचा सहभाग होता. प्रभातफेरी जनता विद्यालय खोपोली पासून सुरू करण्यात आली असून जुनी नगरपरिषद कार्यालय – भाजी मार्केट रोड – सोमजाईवाडी – दत्त सलून खालची खोपोली – बाजारपेठ – जैन मंदिर – पुनश्च जनता विद्यालय खोपोली या मार्गाने काढण्यात आली असून यावेळी प्रभातफेरीच्या माध्यमातून शासनाच्या हर घर तिरंगा , स्वच्छता अभियान , माझी वसुंधरा , प्लास्टिक बंदी या उपक्रमाविषयी जनजागृती करण्यात आली.

प्रभातफेरी मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधांची व्यवस्था नगरपरिषदे मार्फत पुरवल्या असल्याने सर्वानी सदरील प्रभात फेरीचा आनंद घेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

सदरील प्रभात फेरी संपन्न होताच मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी सर्व शाळकरी विद्यार्थी व नागरिकांचे आभार मानले.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.