खालापूर तालुक्यात मान्सून पूर्व आपत्कालीन मदत व्यवस्थापन शिबीर संपन्न

खालापूर – विशेष प्रतिनिधी

माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनी निर्देशित केल्याप्रमाणे, रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून खालापूर तालुका तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखली मान्सून पूर्व आपत्कालीन प्रसंगी वापरल्या जाणाऱ्या संसाधनांची चाचणीसाठी शिबिराचे आयोजन कलोते धरण क्षेत्रात दिनांक 29 मे 2022 रोजी केले गेले.

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी यांत्रिक बोट चालवण्याचे प्रशिक्षण व वॉटर रेस्क्यू संदर्भात रायगड DRF चे सदस्य तथा SRT टीम माणगावचे प्रमुख इम्रान धवलारकर यांच्याकडून प्रात्यक्षिकासह धडे घेतले.

खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख हरिदास सूर्यवंशी आणि संतोष पवार, तुकाराम निरगुडा हे कर्मचारी या प्रशिक्षण शिबिरात सामील झाले होते. खालापूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल विभूते यांनी देखील या शिबिरात प्रत्यक्ष सहभाग घेऊन थरार अनुभवला.

विजय भोसले, अमोल कदम, हनीफ कर्जीकर, राजेश पारठे, दिनेश ओसवाल, धनंजय गीध, संतोष मोरे, भक्ती साठेलकर यांच्यासह फरहान कर्जीकर, अमान बेडेकर, राहूल गोहेरे या युवा सदस्यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून भूमिका बजावली.

आपत्कालीन प्रसंगी महिला आणि मुले यांनाही पुरातून रेस्क्यू करावे लागत असते, अश्या वेळी मदत कार्य कसे करता येऊ शकते,  यासाठी सौ श्रद्धा साठेलकर, श्रीमती नाझनीन धवलारकर या महिलांनी आणि अर्णव मोरे, आदित्य येरूणकर, यज्ञेश भोसले, जय भोसले, बुशरा धवलारकर या लहानग्यानी थरारक कसरतीत हिमतीने सहकार्य केले.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.