पनवेल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी तयारी सुरू

पनवेल दि. ३० ( वार्ताहर ) : राज्यातील नोहेंबर ते डिसेंबर 2022 या दरम्यान मुदत संपणार्‍या सुमारे 7 हजार 649 ग्रामपंचायती आणि नव्याने स्थापित झालेल्याएयाचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये पनवेल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही या टप्प्यात घेण्यात येणार आहेत.


त्या अनुषंगाने गावोगावच्या मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या मतदार याद्यांमध्ये 31 मे 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली विधानसभेची मतदार यादी गृहीत धरण्यात येणार असून,13 ऑक्टोबर रोजी प्रत्येक गावातील प्रभाग निहाय याद्या जाहीर करण्यात येणार आहेत.

त्यावर हरकती घेण्यासाठी 13 ते 18 ऑक्टोबर 2022 हा कालावधी देण्यात आला आहे. या शिवाय प्रभागनिहाय याद्या 21 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध झाली आहेत. पनवेल तालुक्यातील केळवणे, दिघाटी, शिरढोण,चिंध्रण, वाघीवली, शिवकर, कानपोली, करजांडे, भाताण, नितळस, नेरे या ग्रामपंचायतींच्या निवडणूका साधारणतः नोव्हेंबर ते डिसेंबर 2022 अखेर पर्यंत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.