शुश्रूषा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलला क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांनी दिली भेट

मानवाने धरतीवर पाऊल ठेवले तेव्हा पासून जन्म व मृत्यू हे नित्याचे अनिवार्य चक्र चालू असते या दोन्हीच्या मधील दुवा असलेला म्हणजे शुश्रूषा अर्थातच डॉक्टर आपल्या जीवनात नित्याचे महत्त्वाचे व अविभाज्य भाग आहे. आपल्या पनवेल वासियांच्या सेवेसाठी आता नव्याने आपल्या पनवेल नगरीत शुश्रूषा स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाले.
शुश्रुषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल हे नामांकित हृदयरोग तज्ञ डॉक्टर श्री संजय तरळेकर (एम,डी )आणि सौ.अनिता तारळेकर हे प्रख्यात डॉक्टर दांपत्य गेली वीस वर्षापासून जनतेला अविरत बहुमूल्य सेवा देत आहे. तसेच पामबीच येथील शुश्रूषा हार्ट केअर हॉस्पिटल जनतेला आजपर्यंत मागील वीस वर्षापासून सेवा देण्याचे योगदान देत आहे. डॉक्टर संजय तरळेकर यांचा संकल्प आहे की, गोर गरिब व सामान्य जनता आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये याच अनुषंगाने श्री डॉक्टर संजय तरलेकर व सौ डॉक्टर अनिता तारळेकर यांच्या स्वच्छ संकल्पनेतून आपल्या पनवेल नगरीतील नागरिकांच्या सेवेसाठी शुश्रुषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वृक्ष वेल पनवेलच्या नागरिकांसाठी सेवा मालक भावाने ही सेवा चालू करण्यात आली आह. अशा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे सुसज्ज, प्रशस्त, अद्ययावत अत्याधुनिक उपकरणांसह सर्व प्रकारच्या नीदानापासून ते ऑपरेशन्स व सर्व स्टाफ सहित पुरेशा साधनसामग्री व सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर , सर्व प्रकारच्या टेक्निशियन या सर्व सोयी सुविधायुक्त आपल्या सेवेत चालू आहे.
याचेच औचित्य साधून शुश्रूषा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलला क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशच्या अध्यक्ष सौ. रूपालीताई शिंदे व पदाधिकारी यांनी भेट दिली. ह्या ठिकाणी फाउंडेशन च्या महिला अध्यक्ष सौ. रुपालिताई शिंदे यांनी आपले मत मांडत सांगितले कि, सदर हॉस्पिटलचे कार्य हे जास्तीत जास्त गरिबांच्या सेवेसाठी करा, त्यात वाढ होऊ द्या नक्किच हे हॉस्पिटल पनवेल ची शान होईल. हे आपल्या हॉस्पिटल च्या कार्यातुन दिसून येईल असे मत मांडले.
त्याच वेळी शुश्रूषा हॉस्पिटलचे pro व्यवस्थापीकीय अधिकारी व मेडिकल सोशल वर्कर श्री. कुमार लोंढे यांनी सांगितले कि, आम्ही जनतेला सगळ्या शासकीय सुविधांचा लाभ देखील देणार आहोत. कमीत कमी खर्चात आम्ही सर्जरी करू व शासनाच्या सुविधांचा लाभ जनतेला देऊ हे आश्वासन त्या वेळी देण्यात आले.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.