राष्ट्रद्रोहाच्या गंभीर गुन्हे अंतर्गत
अजयसिंह सेंगर यांनी केलेल्या वक्तव्या बाबत संविधान प्रेमी  जगदीश गायकवाड , विद्या गायकवाड व त्यांच्या हजारो  कार्यकर्त्यांनी  निषेध मोर्चा काढला 
(गुरुवार दि.3 फेब्रुवारी)

पनवेल :– डॉ .बाबा साहेबांच्या पवित्र भूमी वर   आमचा अखेरचा श्वास असे पर्यंत अश्या जातीवाद करणाऱ्या  व संविधान बदलणाऱ्या षडयंत्र करणाऱ्या लोकांच्या विरोधात संघर्ष करू व  देशाची एकता अखंडित ठेवू. जो कोणी देशाची एकता मोडण्याचा प्रयत्न करेल त्याची गय केली जाणार नाही असे म्हणत कोकण रिपाई अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी मोर्चा ची सुरुवात केली.

देश भक्त हजारो संविधान प्रेमी ,सामाजिक संघटना, अनेक भीमसैनिक रस्त्यावर ऊतरुन मोर्चात सहभाग घेत निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जगदीश गायकवाड व  मोर्चातील शिष्टमंडळाने खांदेश्वर पोलीसांना निवेदनही देण्यात आले.

पोलीस प्रशासनाने त्यावेळी कडेकोट बंदोबस्त करत शांती सुव्यवस्था टिकवत रस्ते सुरक्षा ,वाहतूक मार्ग म्हणून योग्य नियोजन केले होते.

या निवेदनात महाराष्ट्र करणी सेना अजयसिंह सेंगर यांनी पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये भारतीय संविधानाबाबत केलेले वक्तव्य बेकायदेशीर असून यामुळे समाजातील प्रत्येक जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे  असून सामाजिक शांतता तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे आहे. सदर कृत्य हे राष्ट्रद्रोहाच्या गंभीर गुन्हे अंतर्गत दाखल करावा अशी मागणी निवेदनात केली होती.
भारतीय संविधानाने भारतातील प्रत्येक व्यक्तिला, जातीला
समान दर्जा व समान अधिकार दिलेले आहेत. तसेच
अजयसिंह सेंगर सारखे विकृत मानसिकतेच्या व्यक्तीस
भारतीय संविधानाबाबत अभ्यास नसताना भारतीय
संविधान बदलून नवीन संविधान करण्याबाबत केलेले
वक्तव्य हे समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आहे .
उच्चारले गेलेले वाक्य हेतू पूर्वक संविधान ,जाती ,धर्म विषयी तेढ,वाद,अशांतता निर्माण करणारे आहेत.
तसेच अजसिंह सेंगर यांनी देशातील इतिहासातील मुस्लिम राजे हजरत टिपु सुलतान व अकबर बादशाह या महापुरुषांची नावे घेऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा अशांतता निर्माण करण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्र करणी सेना कार्यक्रमात
अजयसिंह सेंगर यांनी पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये
भारतीय संविधानाचा अवमान करून बेकायदेशीर वक्तव्य
केल्याबद्दल सेंगर यांना येत्या दहा दिवसांत अटक करून
राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

अन्यथा अकराव्या दिवशी कळंबोली महामार्गावर चक्काजाम आंदोलन करू असा इशारा पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण विभाग अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी दिला त्यावेळी नगर सेविका विद्या मंगल गायकवाड व त्यांचे नेते स्थानिक  कार्यकर्ते पदाधिकारी यांनी   मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली  त्यावेळी सर्व उपस्थित लोकांचे  व पोलीस प्रशासनाचे नेते जगदीश गायकवाड व विद्या गायकवाड यांनी आभार मानले .

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.