पनवेल / प्रतिनिधी :- रायगड सम्राट वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंकाचे आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी नेते प्रीतम दादा म्हात्रे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

संपादक शंकर वायदंडे यांच्या रायगड सम्राट दिवाळी अंकचे प्रकाशन
•
शंकर वायदंडे संपादित रायगड सम्राट न्युज पेपर या दिवाळी अंकाचे कौतुक विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे व कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्ष तथा पनवेल टाइम से संपादक गणेश कोळी यांनी केले यावेळी गणेश कोळी यांनी संपादित रायगड सम्राट दिवाळी याची विशेषता सांगितली तसेच प्रीतम म्हात्रे यांनी पत्रकार शंकर वायदंडे यांना या दिवाळी अंकासाठी शुभेच्छा देत अंकाचे कौतुक केले .

यावेळी विशेष उपस्थिती जनसभाचे संपादक आप्पासाहेब मगर,पत्रकार राजू गाडे, पत्रकार सुमंत नलावडे, आपले रायगडचे संपादक सुनील वारगडा पत्रकार अजित अडसुळे पत्रकार प्रणित कापसे पत्रकार आशिष साबळे पत्रकार जतिन शेट्टी याचबरोबर समाजसेवक प्रकाश कातरकर समाजसेवक भरत मोकाशी आधीच अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा अंक जनसामान्यांना वाचण्यासारखा असुन . वाचकांना या दिवाळी अंकात महाराष्ट्रातील नावाजलेल्या व नवोदीत लेखकांचे साहित्य वाचायला मिळणार आहे.

Share this...