सध्या थंडीचे दिवस सुरु झाले आहे अशा थंडीत गार गार आईस्क्रीम खाणाऱ्या खवय्यांचे प्रमाण जास्त असते अशातच आईस्क्रीम सोबतच फालुदा मिळाला तर अधिकच चांगले. मात्र पनवेलमध्ये फालुदा मिळणे म्हणजे फारच मुश्किल त्यातच तो चवदार मिळणे अजूनच कठीण बहुतांश पनवेलकर फालुदा खाण्यासाठी थेट मुंबई गाठतात मात्र आता चवदार आणि भरपेट फालुदा खाण्यासाठी पनवेलकरांना मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही.

विहान ग्रुपचे मालक केवल महाडिक यांनी पनवेल स्पेशल विहान फालुदा शॉपच्या माध्यमातून विविध प्रकारच्या फालुदा खाण्याची सोय पनवेलकराना करून दिली आहे. पनवेल शहरातील अशोका गार्डन समोर, बुधकर दवाखान्याजवळ, श्री सदन अपार्टमेंट, शॉप नंबर ९ जुने पोस्ट ऑफिसजवळ पनवेल स्पेशल विहान फालुदा शॉपचे उदघाटन पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी विहान फालुदा शॉपला शुभेच्छा दिल्या.

विहान फालुदा शॉपमध्ये विविध प्रकारचे फालुदे, आईस्क्रीम, मस्तानी, लस्सी व ज्यूस आदी मिळणार असून पनवेलकरांनी देखील आमच्या या दुकानाला एकदा नक्की भेट द्यावी असे आवाहन विहान ग्रुपचे मालक केवल महाडिक यांनी केले आहे. विहान फालुदा शॉपला पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय नाळे, प्रसिद्ध उद्योजक इकबाल काझी, नगरसवेक मुकीत काझी, जेष्ठ पत्रकार व वादळवारचे संपादक विजय कडू, कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर, पत्रकार संजय कदम, विशाल सावंत, जेष्ठ पत्रकार अरविंद पोतदार, पत्रकार विशाल मनोहर सावंत, सनीप कलोते, संतोष सुतार यांच्यासह हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.