पावनखिंड चित्रपट लावण्याकरता शिवसैनिकांचा खारघर येथील सिनेमागृहात राढा..

खारघर : (दिपक कांबळे)

दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचा पावनखिंड चित्रपट दिनांक १८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे . चित्रपटाला महाराष्ट्रातून गेल्या पाच दिवसांपासून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. असे असताना खारघर शहरांमधील नागरिकांना कार्निवल चित्रपटगृह असून तेथे पावनखिंड चित्रपट सुरू नसल्याने ग्रँड सेंटर सीवूड मॉल व इनॉर्बिट वाशी मॉल येथे चित्रपट पाहण्याकरता जावे लागत आहे . मराठी चित्रपट पावनखिंड खारघर लिटील वर्ल्ड मॉल मधील कार्निवल चित्रपटगृहत लावण्याकरता खारघर मधील शिवसैनिकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट लावण्याकरता राढा केला . जो पर्यंत पावनखिंड चित्रपट खारघर मध्ये लावत नाही तो पर्यंत आम्ही दुसरा कुठलाही चित्रपट येथे चालू देणार नाही असा इशारा शिवसेने चे पनवेल महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील यांनी दिला. खारघर कार्निवल चित्रपटगृह चे व्यवस्थापक यांनी पावनखिंड चित्रपट सुरु करण्यासाठी त्यांच्याकडे सध्या पैसे नसल्याचे सांगितले व पुढील तीन दिवसात चित्रपट खारघर शहरातील चित्रपट चाहत्यांसमोर आणू असे सांगितले..

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.