रायगड जिल्हा शिवसेना पदाधिकारी जाहीर…
जिल्हा संपर्क प्रमुख पदी विजय पाटील, सह संपर्क प्रमुख उल्हासराव भुर्के तर खालापूर तालुका प्रमुख पदी संदेश पाटील, कर्जत तालुका प्रमुख पदी संभाजी जगताप, खोपोली शहर प्रमुख पदी संदीप पाटील, खालापूर शहर प्रमुख पदी पद्माकर पाटील यांची नियुक्ती
मुंबई /22 ऑगस्ट
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र) यांच्या आदेशानुसार आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा(कर्जत -खालापूर -खोपोली )शिवसेना पदाधिकारी जाहीर झाले आहेत.
खालीलप्रमाणे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
विजय भाऊ पाटील – शिवसेना संपर्क प्रमुख – उत्तर रायगड
उल्हास भुर्के – शिवसेना सहसंपर्कप्रमुख उत्तर रायगड
पंकज पाटील – संपर्क प्रमुख कर्जत विधानसभा
शिवराम बदे- कर्जत विधानसभा संघटक
संभाजी जगताप तालुका प्रमुख कर्जत
संदेश पाटील – तालुका प्रमुख खालापूर
पद्माकर पाटील – शहर प्रमुख खालापूर
संदीप पाटील – शहर प्रमुख खोपोली
लक्ष्मण रिठे – शहर संघटक खोपोली
हरीश काळे – शहर संपर्क प्रमुख
शिवसेना पक्ष सचिव संजय मोरे यांनी जाहीर केली आहे.
यावेळी नियुक्ती पत्र उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र थोरवे, सचिव संजय मोरे यांच्या सह कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील नेते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
या नव्या निवडीने सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.