देवळोली ग्रामपंचायतींच्या सरपंच पदी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार व उसराई ग्रामविकास आघाडीच्या ग्रामपंचायत सदस्य सौ.राजश्री राजेश पाटील
प्रतिनिधी /पनवेल

देवळोली ग्रामपंचायतींच्या सरपंच पदी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार व उसराई ग्रामविकास आघाडीच्या ग्रामपंचायत सदस्य सौ.राजश्री राजेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली त्यांचे अभिनंदन करण्यासाठी पनवेल पंचायत समितीचे मा.सभापती व रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्य काशीनाथ वामन पाटील साहेब, पनवेल पंचायत समितीचे मा.सभापती गजानन माळी, रायगड जिल्हा परिषद मा.सदस्य सुरेशशेठ ठाकुर, पनवेल अर्बन बँकेच्या संचालक श्रीमती माधुरी गोसावी, खालापूर पंचायत समितीचे मा.सभापती लक्ष्मण पवार, रायगड जिल्हा परिषद सदस्य राजुशेठ पाटील, पनवेल पंचायत समिती सदस्य जगदीश पवार, सोमटणे ग्रामपंचायतीचे सदस्य सुशांत पाटील, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष अनंत पाटील, मा.सरपंच रामभाऊ पाटील, मा सरपंच संदीप पाटील, प्रभारी सरपंच पी पी पाटील, मा सरपंच काजल मंगेश पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र(देवा) पाटील, ग्रामपंचायत सदस्य आदिती अविनाश गव्हाणकर, ग्रामपंचायत सदस्य विनोद पाटील तसेच देवळोली गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य तसेच तंटामुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते व नातेवाईक तसेच सामाजिक कार्यकर्ते व सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवर व रिक्षाचालक संघटनेचे पदाधिकारी, रायगड सुरक्षा मंडळाचे कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.