महिलांच्या ब्रेस्ट केंसर जागृती बाबतीत रोटरी क्लब व इनरव्हील क्लबची रॅली.
प्रतिनिधी/साबीर शेख
रोटरी क्लब व इनरव्हील क्लब पनवेलच्या वतीने आज पनवेल मध्ये महिलांच्या ब्रेस्ट केन्सर बाबतीत जनजागृती बाईक रॅली आयोजित करण्यात आली.
यावेळी अर्चना परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी च्या अध्यक्षा ध्वनी तन्ना, मेन्टोर क्लबचे हर्मेश तन्ना, सिम्पल आचालिया, इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटीच्या अध्यक्षा हेतल बालड, सचिव गीरा चव्हाण, बिजल मीराणी, ममता ठाकूर, डॉ.फोरम ठक्कर डॉ.वैभव ठक्कर यांच्यासह या रॅलीला सुरुवात झाली.
महिलांना आपण अनेकदा अशा गंभीर आजाराने पीडित पाहतो. त्यांना या आजाराचा सामना करतांना औषधोपचार सह मानसिक आधार व हिम्मतीची गरज असते अशा रॅली मुळे सर्वांना याचे गांभीर्य कळेल असे मत अर्चना परेश ठाकूर यांनी व्यक्त केले.
शहरात झालेल्या या रॅली मुळे सामान्यांना या विषयाची माहिती मिळाली.रॅली मध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या.