माझा व्यवसाय.. माझा हक्क.. योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत फिरते विक्री केंद्र योजनेतून बेरोजगारांना स्वंयरोजगाराची संधि ….शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत
” *ह्रुदयात राम आणि हाताला काम देणार आमचं हिंदूत्व*”
प्रतिनिधी:पनवेल:-
शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व तत्कालीन महाविकास आघाडी सरकार यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत फिरते विक्री केंद्र योजनेतून बेरोजगारांना स्वंयरोजगाराची संधि उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने माझा व्यवसाय माझा हक्क अशी योजना राबविण्यात आली होती.
या योजने अंतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या माध्यमातून खारघर सेक्टर-८ येथील या योजनेच्या लाभार्थी कु. शिवानी शरद पारकर यांच्या यांच्या नावे नवीन वडापाव विक्री चा व्यवसाय या योजनेतून चालू करून दिला .
या गाडीचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या शुभ हस्ते अनेक शिवसैनिकांच्या उपस्थित करण्यात आले.
तसेच या प्रसंगी शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली खारघर येथील शेकडो नागरिकांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.
यावेळी शिवसेना शहर प्रमूख गुरुनाथ पाटील, उपशहर संघटक शंकर सोनुले, विभाग प्रमुख संदीप माने, अनिल तळवणेकर, शाखा प्रमुख संजय कानडे, आनंद व्हावळ, संतोष पाटील, आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—–/////——///// जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क8805288798