कोन सावळा रस्स्त्याची झालेली दुरवस्था तातडीने दुरुस्ती व्हावी आणि प्रत्यक्ष काम सुरू व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेली आमदार बाळाराम पाटिल, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, शेकाप नेते काशीनाथ पाटिल, जगदीश पवार, देवा पाटिल यांच्यासह कार्यकर्ते आणि इंडिया बुल्स मधील महिला, नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनाची दखल घेत लवकरच हा रस्ता पूर्ण करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

             कोन-सावळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे व धुळीच्या साम्राज्यामुळे खराब रस्ता व गेंड्याच्या कातडीचे प्रशासन यांच्या विरोधात कोन फाटा येथे सकाळी अकरा वाजता आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाच्या इशाराने येथील खड्डे भरायचे काम काही दिवसांपूर्वी सुरू झाले मात्र या खड्ड्यावर थांबायचे नाही, ही रस्त्याची अर्धवट मलमपट्टी नको तर संपूर्ण आठ किलोमीटरचा रस्ता काँक्रीटीकरण व्हावे आणि संपूर्ण रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण करुन भरून घ्यावे यासाठी शेकापने रास्ता रोको आंदोलन केले. येथे टोल होता तेव्हा रस्ता चांगला होता. मात्र टोल नाका बंद झाल्यावर रस्त्याची अवस्था खराब झाली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

           गेल्या तीन-चार वर्षापासून खराब रस्त्याचा जनतेला होत असलेल्या नाहक त्रासाला वाचा फोडण्यासाठी शेकापने पुढाकार घेतलेला आहे. शेकापने विषय घेतला तर तो पूर्ण करतोच असे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी सांगितले. कोन पोलीस चौकी ते नवकार या रस्त्यासाठी ४ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नवकार गोडाऊन ते नारपोली हा रस्ता सी. आर. पी. एफ. या फंडातून मंजूर करण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यातच काम पूर्ण होईल असे आश्वासन बांधकाम विभागाच्या अधिकारयानी दिले. काम पूर्ण होईपर्यंत शेकापचा पाठपूरावा सुरू राहणार असल्याचे यावेली आमदार बाळाराम पाटिल यानी सांगितले. या आंदोलना दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.