दुर्गम भागात असलेल्या विद्यालयाला नवसंजीवनी दिल्याबाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे चिंचोडी पाटील येथील ग्रामस्थ व विद्यालयाच्यावतीने आभार मानण्यात आले. 

अहमदनगर जिल्ह्यातील चिंचोडी पाटील गावामध्ये १९६० साली रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय सुरु झाले. या दीर्घकाळात या विद्यालयाची इमारत अत्यंत जीर्ण झाल्याने  पावसाळयात छप्पर गळती व इतर कारणाने विद्यार्थी व शिक्षकांना शिक्षणात खूप गैरसोय होत होती. त्यामुळे नवीन इमारत बांधण्याचा दृष्टिकोनातून विद्यालय व स्कुल कमिटीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मदतीसाठी आवाहन केले होते. त्या अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आर्थिक मदत करून या विद्यालयाला नवसंजीवनी दिली असून या इमारतीच्या बांधकामाचे काम प्रगतीपथावर आहे. त्याबद्दल स्कुल कमिटीचे चेअरमन आबासाहेब कोकाटे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष आप्पासाहेब पवार, सदस्य साहेबराव कोकाटे, मुख्याध्यापक भागवत राठोड, शिक्षक डी. एस. पाचारणे, यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, अनिल कोकाटे आदी उपस्थित होते.
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.