पनवेल मध्ये भाजपा ला खिंडार..
रेणुका गायकर यांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश…
पनवेल (वार्ता)
(दि.२९)शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर प्रेरित होऊन तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली भाजपा च्या केवाळे ग्रामपंचायत सरपंच रेणुका अशोक गायकर तसेच ग्रामपंचायत सदस्य राजेश माळी, जाण्या निरगुडा, भारती भोईर यांच्या सह त्यांच्या कार्यकर्त्यानी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख ज्ञानेश्र्वर बडे, संदीप तांडेल, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर संघटक शशिकांत डोंगरे, शहर प्रमुख यतीन देशमुख, गुरुनाथ पाटील, प्रवीण जाधव, प्रदीप केणी, सदानंद शिर्के, राकेश गोवारी, डी.एन. मिश्रा, महिला आघाडीच्या तालुका संघटीका अनिता डांगरकर, युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..!