आदई सर्कल ते सुकापुर रस्त्याची दुरुस्ती करा …राजेश गणेश केणी
नागरिकांना सुरक्षित प्रवासासाठी दर्जात्मक रस्ते बनवणे गरजेचे
प्रतिनिधी /पनवेल:-
जीवघेणा रस्त्यावर असुरक्षित प्रवास आदई सर्कल ते सुकापुर येथे बहुदा अंगण हॉटेल आणि स्पाइस वाडी हॉटेल या ठिकाणी मोठे खड्डे निर्माण होऊन वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक अक्षरशः कंटाळले आहेत.
पीडब्ल्यूडी चे अधिकारी बरबाडे व टिळे यांच्याशी भयानक परिस्थिती बाबत चर्चा केली व त्यांना निवेदन देऊन वास्तविक गांभीर्य त्यांच्यासमोर मांडले व लवकरात लवकर यावर नागरिकांची सोय करून द्यावी व रस्ते सुरक्षित व्हावे यासाठी सूचना करण्यात आली. वाहतुकीची जी कोंडी होते ती होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी आश्वासित केले असून याबाबत माहिती ट्रॅफिक पोलीस आणि खांदेश्वर पोलीस स्टेशन यांना देखील देण्यात आली असल्याचे केणी यांनी सांगितले