*खारघर ओवे कॅम्प मधील पाणी प्रश्न त्वरित सोडवा -बाळासाहेबांची शिवसेना गटाची मागणी

प्रतिनिधी:-(पनवेल)

ओवे कॅम्प हे खारघर मधील निसर्गरम्य पांडवकडा डोंगरा लगत असून मागील पाच वर्षांपासून, डोंगराचे उतखन प्रक्रिया मूळे उदभवणाऱ्या ध्वनी प्रदूषण, तसेच गावाला मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता दैननीय दुरावस्था , तसेच पाण्याची तीव्र टंचाई, असे अनेक कारणांमुळे , येथील सर्व नागरिक बेजार झालेले आहेत.
पाणीटंचाई तर इतकी भीषण आहे की, खारघर सारख्या सुसज्ज ठिकाणी वसलेल्या गावामध्ये एक दिवस आड आणि तेही फक्त एक ते दोन तास प्रत्येक घराला पाणी उपलब्ध होते.

ऑगस्ट महिन्यामध्ये, पनवेल महानगरपालिकेने एका पत्राद्वारे, सिडको प्रशासनाने मान्यता दिल्याप्रमाणे, 50 एम एम घेरा असलेल्या पुरवठा पाईपलाईन मध्ये वृद्धी करून शंभर एमएम करण्यास मान्यता पत्र दिल्याने, गावामध्ये लवकरच मोठी पाईपलाईन टाकण्याचे लिखित आश्वासन घोषित केले होते.

मात्र दोन महिने उलटले तरीही, हे काम प्रगतीहीन व प्रलंबित पथावर आढळल्याचे लक्षात येताच, शिंदे गटाचे, महानगर संघटक मंगेश रानवडे यांनी जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्या निदर्शनास हि बाब आणून परिस्थितीचे गांभीर्य समजावून दिले . संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली, बाळासाहेबांची शिवसेने गटाचे शिष्ट मंडळ, व ओवे कॅम्प मधील रहिवाशी यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन ही समस्या लवकरात लवकर सोडवावी याबाबतचे निवेदन पत्र सादर केले.

शिष्टमंडळामध्ये, महानगर संघटक मंगेश रानवडे,खारघर शहर संघटक इम्तियाज शेख, मुनाफ अमरेली व झोयेब शेख, तसेच ओवे कॅम्पमधून निवृत्ती सकपाळ व गणेश रेवणे, या चर्चा सभेमध्ये उपस्थित होते.

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी उपस्थित सर्वांना आश्वासित केले की लवकरात लवकर ओवे कॅम्प येथील रहिवाशांच्या पाणीटंचाई बाबत तोडगा काढण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध राहील.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.