जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून आदरणीय तीर्थरू महाराष्ट्रभूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी वृक्ष संवर्धन योजना शिक्षण संकुलांमध्ये सुरू….
प्रतिनिधी पनवेल
आदरणीय तीर्थरूप महाराष्ट्रभूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून आदरणीय तीर्थरू महाराष्ट्रभूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी वृक्ष संवर्धन योजना शिक्षण संकुलांमध्ये सुरू करण्यात आली.
यामध्ये विद्यार्थ्यांना भेट म्हणून त्यांच्या वाढदिवसाला एक छोटे रोपटे देण्यात येणार आहे. शाळांचे मिळून दोन ते अडीच हजार विद्यार्थी सहभागी होते. दरवर्षी तेवढी झाडे लावून त्यासोबतच त्यांचे संवर्धन सुद्धा होईल हेच जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून आदरणीय तीर्थरूप महाराष्ट्रभूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांना आदरांजली असेल असे प्रीतम म्हात्रे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाला सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा शैक्षणिक धोरणामध्ये अशा प्रकारचे वृक्ष संवर्धनासाठी काही ठराविक गुण विद्यार्थ्यांना राखून ठेवावे जेणेकरून दरवर्षी लाखो वृक्ष लागवड होऊन त्यांचे संवर्धन केले जाईल व पर्यावरणाचे महत्त्व म्हणून जनजागृती होईल अशा अभियानातून निसर्ग व मानव यामधील संतुलन कायम राहील