रिजवाना आपांकडून जिंदाशाह मजारच्या धुरीणांचा गुलपोशी कार्यक्रम..!
फकिरी अध्यात्मिक कार्यक्रमाचे बहारदार आयोजन…!

पनवेल /किरण बाथम

रिजवान आपांकडून जिंदाशाह मजारच्या धुरीणांचा गुलपोशी कार्यक्रम..!

बारा इमाम गद्दीनशीन रिजवाना आपा शेख यांनी जिंदाशाह मदारच्या महत्वाच्या फकिरी अध्यात्मिक धुरीणांच्या सत्काराचा गुलपोशी कार्यक्रम आयोजीत केला होता.
कार्यक्रमाच्या निमित्ताने चार सदर आणी पंधरा सीकरदन फकीर यांचा मोठ्या दिमाखदार कार्यक्रमाने सत्कार झाला. गेली 35 वर्षे रिजवाना आपा आपल्या फकिरी अध्यात्माच्या माध्यमातून जनसेवा करत आहेत. गोरगरीब लोकांशी त्यांचा या कार्यामधून सतत संवाद असतो.”दम मदार बेडा पार” असे म्हणून भाविक आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक यातनेतुन आपोआप मार्ग मिळवतात आणी जयघोष करत जातात.
आज बारा इमाम गद्दीनशीन आशीर्वादासाठी हजारो लोक दिवसभर येत असतात अशी माहिती भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड प्रभारी जेष्ठ पत्रकार सय्यद अकबर यांनी दिली.
शरीयत का खलिफा खलील रिफाईच्या तौफिक खांडे यांनी दिवसभर चालणाऱ्या फकिरी अध्यात्मिक कार्यक्रमाची महत्वपूर्ण माहिती “कोकण डायरी”ला दिली. पनवेल -रायगड विभागाच्या संनवर अली शाह, सलवाउला शाह, मेहताब अली शाह, भंडारी सदर हिलाल शाह या प्रमुख सदर प्रमुखसह पंधरा मुख्य धुरीणांचा गुलपोशी सत्कार आध्यत्मिक वातावरणात झाला. यावेळी महफिले समाच्या “नात” गायनात सर्व भारावलेले होते. दिवसभर फकिरी ज्ञानाच्या गाणी व कव्वालीने परिसर वेगळ्याच अनुभूतीत आनंदमग्न होता. सुरत वरून नात व कव्वाली गायनाचे पथक बारा इमाम गद्दी नशीन मध्ये आपल्या गायनाचे समे बांधत होते. शेकडो भाविकांनी अन्नदान समारंभात सहभाग घेऊन महाप्रसाद ग्रहण केले.
चांद अब्दुल शेख, सिकंदर पटेल, नईम शेख, अम्मान शेख आदिसह अनेक भाविकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सहभाग घेतला होता.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.